Vivo Y200 Pro 5G चे भारतातील लाँच आले जवळ, पाहा बीआयएस आणि ब्लूटूथ एसआयजी लिस्टिंग

विवो येत्या काही दिवसांमध्ये आपला वाय-200 सीरिजचा नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या मोबाईलला Vivo Y200 Pro 5G नावाने भारतासह जागतिक मार्केटमध्ये एंट्री मिळू शकते. ही गोष्ट यामुळे खरी वाटत आहे कारण डिव्हाईस भारताच्या बीआयएस वेबसाईट आणि जागतिक लेव्हलवर ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशनमध्ये समोर आला आहे. चला, पुढे लिस्टिंग माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Vivo Y200 Pro 5G BIS आणि ब्लूटूथ एसआयजी लिस्टिंग

  • भारतात बीआयएस प्लॅटफॉर्मवर एक डिव्हाईस V2401 मॉडेल नंबरसह समोर आला आहे.
  • हा मॉडेल नंबर असणारा डिव्हाईसला ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशनवर Vivo Y200 Pro 5G नावाने दिसत आहे.
  • परंतु नाव आणि मॉडेल नंबर व्यतिरिक्त अन्य कोणतीही मोठी माहिती मिळाली नाही, परंतु एक गोष्ट जवळपास निश्चित आहे की फोन लवकर भारत आणि अन्य मार्केटमध्ये येऊ शकतो.
  • मनोरंजक गोष्ट ही आहे की V2401 व्यतिरिक्त मॉडेल नंबर V2303 पण Vivo Y200 Pro 5G सोबत जोडला आहे.
  • तुमच्या माहितीसाठी सांगतो की V2303 पूर्व मॉडेल Vivo V29e होते. म्हणजे नवीन प्रो फोन सह मिश्रित असू शकतो.

Vivo Y200 Pro 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

Vivo Y200 Pro 5G गुगल प्ले कंसोल साईटवर पण दिसला होता. ज्यात याचे प्रमुख स्पेसिफिकेशन समोर आले होते.

  • डिस्प्ले: लिस्टिंग आणि अन्य माहितीनुसार विवो वाय200 प्रो 5 जी फोनमध्ये फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकतो. यावर 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन आणि पंच-होल कटआऊट डिझाईन दिले जाऊ शकते.
  • प्रोसेसर: गुगल प्ले कंसोलवर सांगण्यात आले होते की विवो वाय 200 प्रो 5 जी मध्ये युजर्सना क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट दिला जाऊ शकतो. हा 6nm प्रक्रियावर चालतो यात ग्राफिक्ससाठी एड्रेनो 619 जीपीयू पण मिळण्याची शक्यता आहे.
  • स्टोरेज: गुगल प्ले कंसोल सर्टिफिकेशन साईटवर विवो वाय200 प्रो 5 जी फोन 8 जीबी रॅम स्टोरेजसह लिस्ट झाला होता. तर लाँचच्या वेळी या फोनसाठी ब्रँड अन्य मेमरी ऑप्शन घेऊन शकतो.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता नवीन मोबाईल Vivo Y200 Pro 5G लेटेस्ट अँड्रॉइड 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here