Vivo Y27 5G फोन सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट, असे मिळू शकतात स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • Vivo लवकरच एक नवीन 5G डिवाइस लाँच करू शकते.
  • सर्टिफिकेशन वेबसाइटवर माहिती समोर आली आहे.
  • ह्यात Dimensity 6020 प्रोसेसर मिळू शकतो.

मोबाइल निर्माता विवो लवकरच एक नवीन 5जी डिवाइस लाँच करू शकते. स्मार्टफोनची एंट्री Vivo Y27 5G च्या स्वरूपात होऊ शकते. फोन एनबीटीसी सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे. पुढे वेबसाइटवरून समोर आलेल्या लिस्टिंगची माहिती आणि लीक स्पेसिफिकेशन तुम्ही सविस्तर वाचू शकता.

Vivo Y27 5G एनबीटीसी लिस्टिंग

एनबीटीसी सर्टिफिकेशन साइटवर विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V2302 मॉडेल नंबरसह स्पॉट झाला आहे. लिस्टिंगमध्ये फोनचं नाव Vivo Y27 5G कंफर्म झालं आहे. नॅशनल ब्रॉडकास्टिंग अँड टेलीकम्युनिकेशन कमीशनवर सध्या इतर माहिती मिळाली नाही परंतु असं नक्की म्हणता येईल की विवो लवकरच नवीन 5जी फोन मार्केटमध्ये आणेल.

Vivo Y27 5G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.44 इंचाचा एलसीडी एफएचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. ह्यात 90hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर : प्रोसेसर पाहता डिवाइस गीकबेंचवर Dimensity 6020 प्रोसेसरसह दिसला आहे. म्हणजे फोनह्या प्रोसेसरसह लाँच होण्याची शक्यता आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅम + 128GB इंटरनल स्टोरेजच्या बेस मॉडेलसह येऊ शकतो. तसेच लाँचच्या वेळी इतर व्हेरिएंट देखील सादर होऊ शकतात.

  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइस ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची सेकंडरी बोकेह कॅमेरा लेन्स मिळू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लेन्स असण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी : Vivo चा नवीन 5G डिवाइस दीर्घकाळ टिकणाऱ्या 5000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतो.
  • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी डिवाइसमध्ये ड्युअल सिम 5G, 4G, ब्लूटूथ, वायफाय सारखे अनेक बेसिक फीचर्स मिळू शकतात.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर आधारित असेल.
  • अन्य : ह्यात IP54 रेटिंग, NFC सपोर्ट आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here