ड्रायविंग लायसन्सविना चालवता येणार या दोन इलेक्ट्रिक बाइक; सिंगल चार्जवर धावतात 110KM

स्वदेशी इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड कॉरिट इलेक्ट्रिक (Corrit Electric) नं भारतीय बाजारात दोन नवीन लो-स्पीड फॅट टायर इलेक्ट्रिक बाइक Hover 2.0 (हॉवर 2.0) आणि Hover 2.0+ (हॉवर 2.0+) लाँच केल्या आहेत. कंपनीच्या मते, या बाइक किशोरवयीन चालकांसाठी आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांवर पर्यटकांसाठी डिजाइन करण्यात आल्या आहेत. तसेच या दोन्ही ई-बाइक कंपनीनं रेड, येलो, ब्लॅक आणि व्हाइट या चार कलर ऑप्शन्समध्ये सादर केल्या आहेत. चला जाणून घेऊया या दोन्ही बाइक्सची किंमत, रेंज आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्सची माहिती.

Hover 2.0 आणि Hover 2.0+ ची रेंज

रेंज पाहता हॉवर 2.0 सिंगल फुल चार्जिंगवर 80 किमीचा प्रवास करू शकते. तर हॉवर 2.0+ बद्दल कंपनीनं दावा केला आहे की ही फुल चार्ज वर 110 किमीची रेंज देईल. तसेच कंपनीनं सांगितलं आहे की या ई-बाइक कस्टम बाइक कव्हर आणि मोबाइल होल्डरसह कम्पॅटेबल आहेत, जे हॉवर 2.0+ सह कंप्लीमेंट्री मिळतील. परंतु हॉवर 2.0 मध्ये अ‍ॅक्सेसरी म्हणून विकले जातील. हे देखील वाचा: Mukesh Ambani 29 ऑगस्टला करत आहेत मोठा इव्हेंट, Jio 5G SIM आणि 5G Plans ची होणार घोषणा

लायसन्सची गरज नाही

कंपनीनं या बॅटरी असलेल्या बाईक्स खासकरून 12 ते 18 वर्ष वयोगटासाठी बनवल्या आहेत. तसेच, Hover इलेक्ट्रिक बाइकचा मॅक्सिमम स्पीड फक्त ताशी 25 किलोमीटर आहे. त्यामुळे या चालवण्यासाठी ड्रायविंग लायसन्सची गरज नाही.

काही बॅटरीवर चालणारी दुचाकी वाहने ज्यांचे पावर आउटपुट 250 वॉट पेक्षा कमी आणि टॉप स्पीड ताशी 25 पेक्षा कमी आहे, ती सेंट्रल मोटर व्हेईकलच्या नियमानुसार इलेक्ट्रिक सायकल किंवा ई-बाइकच्या कॅटेगरीमध्ये येतात. ही वाहने कोणत्याही ड्रायविंग लायसन्सविना देखील चालवता येतात. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत लाँच झाला नोकियाचा 5G Phone; जाणून च्या Nokia G400 चे स्पेसिफिकेशन्स आणि प्राइस

स्पेसिफिकेशन्स

कंपनीनं हॉवर 2.0 मध्ये 1.5kWh ची बॅटरी दिली आहे आणि हॉवर 2.0+ मध्ये 1.8kWh ची Battery मिळते. तसेच दोन्ही इलेक्ट्रिक बाइक्सचा टॉप स्पीड ताशी 25 किमी इतका आहे आणि कंपनीचा दावा आहे की या 0 ते 25 किमी प्रति तास वेग फक्त 3 सेकंदात गाठू शकतात. तसेच या बाइकची खास बाब अशी की या 250 किलोग्राम वजन पेलू शकतात. यांच्या दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक, ट्यूबलेस टायर आणि ड्युअल शॉक अब्जॉर्बर देण्यात आला आहे.

नवीन इलेक्ट्रिक बाइकची प्राइस

प्राइस पाहता, कंपनीनं Hover 2.0 बाईक 79,999 रुपयांमध्ये सादर केली आहे. तर, Hover 2.0+ ची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी आकर्षक फायनान्स सुविधा देत आहे, इच्छुक ग्राहक या लीजवर देखील घेऊ शकतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here