8GB रॅम असलेल्या Vivo Y35 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • Vivo Y35 8जीबी रॅम आणि 8जीबी एक्सटेंडेड रॅमसह येतो.
  • फोनमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो.

Vivo Y35 गेल्यावर्षी भारतात लाँच केला होता. स्मार्टफोन दोन कलर व्हेरिएंट- अगेट ब्लॅक आणि डॉन गोल्ड मध्ये उपलब्ध झाला होता. आता जवळपास एक वर्षांनी ह्या फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. 91मोबाइल्सला ऑफलाइन रिटेल सोर्सकडून माहिती मिळाली आहे की विवो वाय आता 17,499 रुपये नव्हे तर 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. आता ह्या फोनची किंमतीत 500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

1,000 रुपयांचा कॅशबॅक

डिस्काउंटनंतर फोन ICICI, SBI, kodak कार्डवरून खरेदी केल्यावर 1,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. म्हणजे फोन 16,999 रुपयांपेक्षा देखील कमी किंमतीत विकत घेता येईल. पुढे तुम्हाला फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Vivo Y35 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.58-इंच FHD+ 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज : तसेच स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे, जो 6nm चिपसेट बेस्ड आहे. फोन 8GB रॅम आणि 8 GB व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह येतो. त्याचबरोबर स्टोरेजसाठी 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
  • बॅटरी : फोन 44W फ्लॅश चार्जिंगसह येतो. फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y35 इमर्सिव गेमिंगसाठी मल्टी टर्बो आणि अल्ट्रा गेम मोडसह येतो.
  • ओएस : फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. हा FunTouch OS 12 बेस्ड Android 12 वर चालतो.
  • कॅमेरा : Vivo Y35 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जोडीला 2MP बोकेह आणि 2MP मॅक्रो कॅमेऱ्यासह एक मोठा सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • कनेक्टिव्हिटी : हा फोन 5G सपोर्ट असलेला फोन नाही परंतु ह्यात 4G VoLTE, ब्लूटूथ 5.0, GPS/GLONASS, USB टाइप-C आणि वाय-फाय 802.11 ac (2.4GHz + 5Ghz) चे कनेक्टिव्हिटी ऑप्शन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here