5 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला Vivo Y50 झाला लॉन्च, या दिवशी होईल पहिला सेल

Vivo ने भारतात आपली ‘Y’ सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन वीवो वाय50 सादर केला आहे. अलीकडेच 91 मोबाईल्सने एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि कंपनी या महिन्यात वावी वाय50 सादर करणार आहे. तर आता कंपनीने डिवाइस लॉन्च करून पुन्हा एकदा आमची बातमी खरी असल्याचे सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे हा डिवाइस चीन मध्ये आधीच लॉन्च झाला आहे. तसेच भारतात कंपनी ‘वाय’ सीरीज मध्ये Vivo Y30 पण या महिन्यात सादर करणार आहे.

Vivo Y50 फक्त सिंगल 8जीबी रॅम+128जीबी वेरिएंट मध्ये विकला जाईल. चीन मध्ये हा फोन 6जीबी रॅम मध्ये पण सादर केला गेला होता. डिवाइसची विक्री 10 जून पासून होईल. तसेच हँडसेट मध्ये 5000mAH ची पावरफुल बॅटरी आणि FHD+ फुल व्यू डिस्प्ले आहे. तसेच Vivo Y50 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट देण्यात आला आहे.

किंमत

कंपनीने वीवो वाय50 17,990 रुपयांमध्ये सादर केला आहे. हि किंमत 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची आहे. लक्षात असू द्या कि Cambodia मध्ये वीवो वाय50 $249 (जवळपास 19,000 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला होता. फोन वीवो इंडिया ई-स्टोर, अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटा क्लिक आणि ऑफलाइन स्टोर वर 10 जून पासून विकला जाईल. लॉन्चच्या आधी काही दिवसांपूर्वी फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर दिसला होता.

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाची अल्ट्रा ओ स्क्रीन आणि फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर असेल. फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

तसेच फटोग्राफीसाठी फोन मध्ये रियर वर 13-मेगापिक्सल प्राइमरी शूटर, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल शूटर 120 डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू, 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो सेंसर फोकल लेंथ सह येतो. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

वीवो वाय50 वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here