वारंवार हँग होत आहे का स्मार्टफोन? घरबसल्या चुटकीसरशी करा दुरुस्त, जाणून घ्या सोपे उपाय

Highlights

  • स्मार्टफोनची परफॉर्मन्स वेळेनुसार मंदावते, त्यामुळे तो नेहमी हँग होत असतो.
  • स्मार्टफोनमध्ये मल्टीपल अ‍ॅप्स एकत्र वापरल्यावर देखील फोन हँग होतो.
  • स्मार्टफोन हँग होऊ नये म्हणून फोनच्या कॅशे फाइल्स वेळोवेळी डिलीट केल्या पाहिजेत.

सध्या स्मार्टफोनविना आयुष्याची कल्पना करवत नाही. आपण स्मार्टफोनवर खूप जास्त अवलंबुन आहोत. शॉपिंगपासून, बिल पेमेंट, तिकीट बुकिंग आणि आपले नातेवाईक आणि मित्रांशी कनेक्ट करण्यासाठी आपण स्मार्टफोनची मदत घेतो. यामुळे जेव्हा आपण आपल्यासाठी स्मार्टफोन घेतो तेव्हा रोजच्या कामासाठी वापरताना तो हँग होऊ याची काळजी घेतो. अनेकदा मोबाइल फोन काम सुरु असताना इतका हँग होतो की बंद पडतो. जर तुम्ही देखील स्मार्टफोन हँग होण्याची समस्या अनुभवली असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही घरबसल्या मोबाइल फोन हँग होण्याची समस्या सोडवू शकता.

फोन हँग का होतो?

स्मार्टफोन हँग होण्यामागे फक्त एक कारण नाही. तुमचा फोन अनेक कारणांमुळे हँग होऊ शकतो. कदाचित तुमच्या फोनमध्ये रॅम कमी असेल आणि तुम्ही मल्टीपल (एकापेक्षा जास्त) अ‍ॅप वापरत असाल. फोनमध्ये कॅशे फाइल स्टोर झाल्या असतील किंवा फोन अपडेट केला नसेल. यातील कोणतेही कारण असू शकते, ज्यामुळे फोन हँग होतो. पुढे आम्ही तुम्हाला प्रत्येक कारणाची माहिती आणि उपाय दिला आहे.

कॅशे फाइल डिलीट करा

कॅशे फाइल आपल्या फोनमध्ये स्टोर करण्यात आलेल्या अतिरिक्त रिसोर्स फाइल्स असतात ज्या फोनमधील इस्टॉल अ‍ॅप नीट चालावे यासाठी उपयुक्त असतात. परंतु जेव्हा या फाइल्स जास्त प्रमाणात साठतात तेव्हा फोनची परफॉर्मन्स प्रभावित होते. त्यामुळे वेळोवेळी कॅशे फाइल्स डिलीट करणं आवश्यक आहे. कॅशे फाइल डिलीट करण्यासाठी तुम्ही फोनच्या स्टोरेज ऑप्शनमध्ये जाऊन तिथून या सहज डिलीट करू शकता. तसेच अँड्रॉइड युजर्स फोनच्या कॅशे फाइल ‘अ‍ॅप इन्फो’ ऑप्शनमध्ये जाऊन देखील डिलीट करू शकतात.

एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स वापरू नका

शक्य असल्यास फोनमध्ये एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स वापरू नये. खासकरून जर तुमच्या फोनमध्ये रॅम स्टोरेज कमी असेल तर. असं केल्यास तुमच्या फोनच्या रॅमवर जास्त ताण येतो आणि फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. जर तुमच्या फोनची रॅम कमी असेल तर आम्ही तुम्हाला फोनमध्ये एकावेळी एकापेक्षा जास्त अ‍ॅप न वापरलेलं उत्तम. असे केल्यास फोनचं मेमरी मॅनेजमेंट व्यवस्थित राहील आणि तुमचा फोन हँग होणार नाही.

सॉफ्टवेयर अपडेट असावं

जर तुम्ही फोनच्या कॅशे फाइल डिलीट केल्या असतील आणि मल्टीपल अ‍ॅप्स देखील वापरत नसाल आणि तरीही फोन वारंवार हँग हो असेल तर तुमच्या फोनचं सॉफ्टवेयर अपडेट करून पाहा. अनेकदा फोनचं सॉफ्टवेयर अपडेट न केल्यामुळे देखील फोन हँग होतो. तसेच तुम्ही फोनमध्ये जे अ‍ॅप्स वापरत असाल ते देखील वेळावेळी अपडेट करावे. फोन किंवा अ‍ॅप्स अपडेटेड नसल्यामुळे काही रिसोर्स फाइल गायब होतात आणि त्यामुळे फोन हँग होतो. त्यामुळे फोन आणि अ‍ॅप्स दोन्ही वेळावेळी अपडेट करावे.

फोन रिस्टार्ट करा

फोनची परफॉर्मन्स कालांतराने कमी होऊ लागते. त्यामुळे फोन हळूहळू हँग होऊ लागतो. फोन हँग होऊ नये म्हणून आम्ही वर काही उपाय सांगितले आहेत जसे की – वेळावेळी कॅशे फाइल डिलीट करणं, सॉफ्टवेयर आणि अ‍ॅप्स अपडेट करणं, मल्टीपल अ‍ॅप्स न वापरणं. त्याचबरोबर फोन वेळावेळी रिस्टार्ट देखील करावा. फोन रिस्टार्ट केल्यावर फोनमधील तात्पुरत्या फाइल्स डिलीट होतात आणि फोनचं मेमरी मॅनेजमेंट रिसेट होतं. फोनचा स्पीड सुधारतो आणि फोनची परफॉर्मन्स वाढते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here