लवकरच सुरु होऊ शकते Vodafone Idea ची 5G सर्व्हिसेस; खुद्द कंपनीनं दिली माहिती

Highlights

  • कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटलं की Vi लवकरच भारतात 5G लाँच करेल.
  • कंपनीनं सध्या 5जी रोलआउटसाठी कोणतीही टाइमलाइन दिली नाही.
  • दुसरीकडे जियो आणि एयरटेल देशात वेगानं 5जी नेटवर्कचा विस्तार करत आहेत.

Vodafone idea 5G च्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आदित्य बिर्ला समूहचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटलं आहे की वोडाफोन आयडिया लवकरच भारतात 5जी सेवा सुरु करेल. परंतु त्यांनी लाँच टाइमलाइनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. बिर्ला यांनी AIMA अवार्ड्सच्या प्रसंगी सांगितलं की, “5G रोलआउट लवकरच सुरु होईल.” तर दुसरीकडे भारतात Airtel आणि Jio वेगानं 5जी नेटवर्कचा विस्तार करत आहेत.

विआय 5G लाइव्ह करण्यासाठी सुरु आहे तयारी

काही महिन्यांपूर्वी विआय कंपनीच्या कस्टमर सपोर्ट टीमनं ट्विटरवर सांगितलं होतं की, “Vi अनेक शहरांमध्ये 5G आणण्यासाठी सक्रिय पद्धतीनं भागीदारांसह काम करत आहे” आणि लवकरच आपल्या प्लॅनिंगचा खुलासा करेल.

Vi करत आहे संघर्ष

वोडाफोन-आयडिया 5जी सेवा लाइव्ह न केल्यामुळे आपले ग्राहक गमावू शकते. कारण अन्य दूरसंचार कंपन्यांनी खूप आधीपासून अनेक राज्यांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. वोडाफोन आयडियानं 31 डिसेंबर, 2022 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 7,990 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे.

कंपनीनं सप्टेंबरच्या तिमाहीत 7,595.5 कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. तसेच डिसेंबर तिमाहीत एकूण महसूल 10,620.6 कोटी रुपये होता, जो सप्टेंबरच्या तिमाहीत 10,614.6 कोटी रुपयांच्या तुलनेत 0.1 टक्के जास्त आहे.

एयरटेल आणि जियोला होतोय फायदा

दुसरीकडे एका रिपोर्टनुसार एयरटेलनं डिसेंबर 2022 मध्ये हरियाणा आणि ओरिसा सर्कलमध्ये 0.1 मिलियन आणि 0.2 मिलियन सक्रिय युजर्सना जोडले आहेत. यामुळे एयरटेलच्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की डिसेंबर ध्ये रिलायन्स जियोच्या सक्रिय युजर बेसमध्ये 3 मिलियनची वाढ झाली आहे, तर याच कालावधीत एयरटेलला 6 मिलियन ग्राहक जोडण्यात यश मिळालं आहे. यावरून स्पष्ट होत आहे की वोडाफोन आयडियाची 5जी सर्व्हिस नसण्याचा थेट फायदा दुसऱ्या दोन टेलिकॉम कंपन्यांना होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here