वोडाफोन पुन्हा एकदा प्रीपेड यूजर्स साठी घेऊन आला आहे 50 आणि 100 रुपयांचे रिचार्ज प्लान, मिळतील हे फायदे

टेलिकॉम मधील दिग्गज कंपनी वोडाफोनने काही दिवसांपूर्वी आपले तीन रिचार्ज बंद केले होते, ज्यात 50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयांच्या रिचार्ज प्लान्सचा समावेश होता. या प्लानच्या जागी कंपनी ने काही ऍक्टिव्ह रिचार्ज प्लान्स लॉन्च केले होते, ज्यांची सुरवाती किंमत 23 रुपये होती. आता पुन्हा एकदा कंपनी ने आपले तिन्ही रिचार्ज सादर केले आहेत. पण यावेळी अधिप्रमाणे प्लान्स सोबत लाइफटाइम वॅलिडिटी मिळणार नाही.

50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयांच्या रिचार्ज प्लान्स मध्ये तुम्हाला यावेळी 28 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. विशेष म्हणजे आधी या प्लान सोबत यूजर्सना लाइफटाइन वैधता मिळत होती, ज्याचा अर्थ असा कि या रिचार्ज सह आधी यूजर्सना कायमची वैधता मिळत होती.

टॉकटाइम प्लान्स मध्ये मिळतील हे फायदे
टॉकटाइम प्लान्स बद्दल बोलायचे झाले तर या सर्व प्लान मध्ये 28 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. 50 रुपयांच्या रिचार्ज प्लान बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 39.7 रुपयांचा टॉकटाइम मिळेल, ज्यात वॅलिडिटी लिमिट नाही, ज्याचा अर्थ असा कि उरलेला बॅलेन्स कॅरी फॉरवर्ड होईल. जर यूजर्सनी एका महिन्यांनी रिचार्ज केला तर त्यात उरलेला बॅलेन्स ऍड होईल.

हे देखील वाचा: एआई कॅमेरा आणि मीडियाटेकच्या दमदार प्रोसेसर सह लॉन्च झाला एलजी के12+, बघा किंमत आणि फीचर्स

100 रुपयांच्या रिचार्ज प्लान बद्दल बोलायचे तर यूजर्सना यात पूर्ण 100 रुपयांचा बॅलेन्स मिळेल. आधीच्या प्लान प्रमाणे या प्लानची वॅलिडिटी पण 28 दिवसांची आहे. तसेच जर 500 रुपयांच्या रिचार्ज बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला 84 दिवसांची वॅलिडिटी मिळते. तसेच हे प्लान्स तुमच्या चालू रिचार्जच्या वॅलिडिटी सह येतात.

विशेष म्हणजे वोडाफोन आपल्या 10 रुपये, 1,000 रुपये आणि 5,000 रुपयांच्या प्लान सोबत लाइफटाइम वॅलिडिटी ऑफर करत आहे. पण या प्लान्स मध्ये आउटगोइंग 28 दिवसांनी बंद होते.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव : सॅमसंग गॅलेक्सी ए20ई च्या डिजाईनचा खुलासा, बघा कसा असेल हा फोन

टेलीकॉम कंपनी वोडाफोन ने काही दिवसांपूर्वी 129 रुपयांचा प्लान सादर केला होता जो एक बोनस कार्ड प्लान आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. वोडाफोनचा हा प्लान गुजरात, चेन्नई आणि काही महत्वपूर्ण सर्कल्स मध्ये उपलब्द आहे. वोडाफोनच्या 129 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलची सुविधा मिळेल. तसेच या प्लान मध्ये 1.5 जीबी डेटा मिळेल जो संपूर्ण वैधतेसाठी असेल. इतकेच नव्हे तर यूजर्सना या प्लान मध्ये 100 एसएमएस प्रति दिन मिळतील.

वोडाफोन आइडिया ला लाइफ टाइम फ्री इनकमिंग सेवा बंद केल्यामुळे खूप नुकसान झाले आहे. मागे कंपनी ने मिनिमम वॅलिडिटी रिचार्ज लागू केला आहे. त्यांनतर ट्राई च्या रिपोर्ट मध्ये दिसले होते कि कंपनीच्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here