BGMI पुन्हा भारतात आणण्यासाठी कंपनी प्रयत्नशील; सरकारशी चर्चा सुरु

Krafton नं PUBG (PlayerUnknown’s Battlegrounds) चा इंडियन व्हेरिएंट BGMI (Battlegrounds Mobile India) सप्टेंबर 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता. हा भारतात काही काळ टॉप मोबाइल बॅटल रॉयल गेम्स पैकी एक बनला होता. परंतु लाँच नंतर एक वर्षातच भारत सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेचा कारण देऊन या गेमवर बंदी घातली. बॅन होताच हा गेम गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून हटवण्यात आला. इंडिया टूडे टेकशी बोलताना कंपनीनं कंफर्म केलं आहे की ते गेम पुन्हा भारतात आणण्यासाठी कंपनी सरकारशी चर्चा करत आहेत.

दक्षिण कोरियन कंपनी Krafton बॅटल रोयाल गेम PUBG ची डेव्हलपर आहे. या गेमची पब्लिशर चिनी आयटी फर्म Tencent आहे. परंतु भारतात बॅन झाल्यानंतर क्राफ्टननं बीजीएमआय पब्लिश करण्याची जबाबदारी घेतली. हा गेम भारत सरकारनं 28 जुलैला सुरक्षेच्या कारणांमुळे बॅन केला. बॅन केल्यापासून ऑफिशियल अ‍ॅप स्टोरवर हा गेम उपलब्ध नाही. परंतु ज्या युजर्सच्या फोनमध्ये हे अ‍ॅप आहे ते हा गेम खेळू शकतात. बॅन झाल्यापासून या गेमच्या पुनरागमनाची वाट बघितली जात आहे. हे देखील वाचा: स्वदेशी कंपनीची कमाल! चिनी कंपन्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी 6,999 रुपयांमध्ये दमदार स्मार्टफोन

बीजीएमआयचं पुनरागमन होणार का?

BGMI वरील बंदी नंतर Krafton नं ऑफिशियल स्टेटमेंट जारी करून सांगतील आहे की, कंपनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि इंफॉरमेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय (MeitY) शी सतत बोलणी करत आहे. इंडिया टूडे टेकशी बोलताना कंपनीनं कंफर्म केलं आहे की ते गेम पुन्हा यावा याविषयी चर्चा करत आहेत.

अनेक युट्युबर्स आणि गेमिंग पर्सनॅलिटीनुसार, BGMI गेम भारतात 2022 च्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला पुनरागमन करू शकतो. तर क्राफ्टन देखील सरकार सोबत मिळून BGMI गेम भारतात पुन्हा आणण्याची तयारी करत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. परंतु या गेमच्या रिलाँच बद्दल ठोस माहिती मात्र मिळाली नाही. हे देखील वाचा: एकच नंबर! 14 हजारांच्या रेंजमध्ये Samsung चा 5G Phone; अशी आहे ऑफर

दोन नवीन गेम घेऊन येतेय क्राफ्टन

बीजीएमआय आणि पबजी मोबाइल निर्माता क्राफ्टननं भारतीय चाहत्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. कंपनीनं भारतीय बाजारात दोन नवीन गेम घेऊन येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढील वर्षीच्या कंपनी सुरुवातीला दोन गेम – द कॅलिस्टो प्रोटोकॉल आणि डिफेंस डर्बी लाँच करण्याची योजना बनवत आहे. म्हणजे पबजी आणि बीजीएमआयची निर्मिती करणारी दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टन लवकरच भारतात आणखी 2 नवीन गेम लाँच जाणार आहे.

BGMI आणि PUBG Mobile ची निर्मिती करणाऱ्या क्राफ्टननं भारतीय फॅन्ससाठी ही गुड न्यूज शेयर केली आहे. त्यानुसार क्राफ्टन भारतात दोन नवीन गेम लाँच करणार आहे. हे गेम कसे असतील, हे देखील बॅटल रोयाल पद्धतीचे असतील का? की यांची पद्धत वेगळी असेल, हे मात्र अद्याप समोर आलं नाही. परंतु Krafton नं सांगितलं आहे की भारतात दोन नवीन गेम – The Callisto Protocol (द कॅलिस्टो प्रोटोकॉल) आणि Defense Derby (डिफेंस डॉर्बी) लाँच केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here