स्मार्टफोन इंडस्ट्री मध्ये अजूनही सर्व स्मार्टफोन कंपन्यांमध्ये कोण जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन को सर्वात आधी लॉन्च करेल या साठी चढाओढ सुरु आहे. आता एक असा रिपोर्ट समोर आला आहे जो स्मार्टफोन मार्केट मध्ये धमाका करू शकतो. समोर आलेल्या रिपोर्टनुसार पुढच्या महिन्यात जगातील पहिला 192 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर केला जाऊ शकतो.
या रिपोर्टच्या आधी एक लीक समोर आला होता, त्यानुसार शाओमी आपल्या 144 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या फोन वर काम करत आहे. आता ‘Digital Chat Station’ नावाच्या यूजर हँडलने चीनच्या माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo वर एक पोस्ट केली आहे, त्यानुसार पुढल्या महिन्यात 192 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन येऊ शकतो.
रिपोर्टनुसार स्मार्टफोन 192 मेगापिक्सलच्या कॅमेरा सोबतच स्नॅपड्रॅगॉन 765 प्रोसेसर सह येईल. फोन कोणत्या कंपनीचा असेल याबाबत अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. पण बोलले जात आहे कि कंपनी हा फोन कमी किंमतीत बाजारात सादर करू शकते.
स्नॅपड्रॅगॉन 765 तांत्रिकदृष्टया 192 मेगापिक्सल कॅमेऱ्याला सपॉर्ट करतो कि याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. इमेज प्रोसेसिंग मध्ये आणि फोटो क्लिक करण्यासाठी हा प्रोसेसर किती वेळ घेईल हे देखील सांगता येणार नाही.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि सॅमसंग आपल्या 150 मेगापिक्सल रेजॉलूशन असलेला सेंसर वर काम करत आहे. सॅमसंगच्या 150 मेगापिक्सल सेंसरचा आकार 1 इंच असेल. हा 1/1.33 इंच ISOCELL Bright HM1 सेंसर पेक्षा मोठा असेल.
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी बनवत असलेला हा 150 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर नॅनोसेल टेक्नोलॉजी वर आधारित असेल, जो कंपनीने ISOCELL Bright HM1 मध्ये पण वापरला होता. हा सेंसर कंपनीने Samsung Galaxy S20 Ultra मध्ये पण दिला आहे. विशेष म्हणजे हा जुन्या Tetracell टेक्नोलॉजीचा अपग्रेड पण आहे, जी ISOCELL Bright HMX सारख्या सेंसर मॉड्यूल मध्ये दिली जाते.
या सेंसरचा शाओमी व्यतिरिक्त Oppo आणि Vivo पण वापर करू शकते. याचा अर्थ असा कि या कंपन्या आपल्या फोन्स मध्ये आगामी काळात 150 मेगापिक्सल सेंसरचा वापर करतील. काही रिपोर्ट्सनुसार चिनी कंपनी शाओमी यावर्षी चौथ्या तिमाहीत हा सेंसर आपल्या फ्लॅगशिप मध्ये देण्याचा विचार करत आहे.














