Xiaomi 12S, 12S Pro, आणि 12S Ultra स्मार्टफोन झाले चीनमध्ये लाँच

Xiaomi 12s Ultra

शाओमीनं टेक मंचावर शक्तिप्रदर्शन करत Xiaomi 12S, Xiaomi 12S Pro, आणि Xiaomi 12S Ultra हे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या हँडसेटमध्ये TSMC च्या 4nm प्रोसेसवर बनलेला Qualcomm Snapdragon 8+ Gen1 हा शक्तिशाली प्रोसेसर देण्यात आला आहे. चांगल्या कॅमेरा सिस्टमसाठी कंपनीनं Leica सह पार्टनरशिप केली आहे. तसेच Xiaomi 12S सीरीज पंच होल कटआउट, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आली आहे. यातील सर्वात शक्तिशाली Xiaomi 12S Ultra स्मार्टफोनमध्ये कंपनीनं Sony IMX989 सेन्सरचा वापर केला आहे जो एक इंचाचा सेन्सर आहे, परंतु इतका भन्नाट कॅमेरा सेटअप असलेला हँडसेट चीनबाहेर सादर केला जाणार नाही, म्हणून चाहते नाराज झाले आहेत.

Xiaomi 12S, 12S Pro, आणि 12S Ultra ची किंमत

Xiaomi 12S स्मार्टफोनचा 8GB/128GB व्हेरिएंट 3999 RMB (सुमारे 47,100 रुपये), 8GB/256GB व्हेरिएंट 4,299 RMB (सुमारे 50,700 रुपये), 12GB/256GB व्हेरिएंट 4,699 RMB (सुमारे 55,600 रुपये) आणि 12GB + 512GB मॉडेल 5,199 RMB (सुमारे 61300 रुपये) मध्ये विकत घेता येईल.

Xiaomi 12S Pro स्मार्टफोनचा 8GB/128GB मॉडेल RMB 4699 (सुमारे 55,400 रुपये), 8GB/256GB मॉडेल RMB 4,999 (सुमारे 58,900 रुपये). 12GB/256GB मॉडेल को RMB 5,399 (सुमारे 63,600 रुपये) आणि 12GB/512GB मॉडेल RMB 5,899 (सुमारे 69,500 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे.

Xiaomi 12S Ultra स्मार्टफोनचा 8GB/256GB व्हेरिएंट RMB 5,999 (सुमारे 71,000 रुपये), 12GB/256GB व्हेरिएंट 6,499 RMB (सुमारे 77,000 रुपये) आणि 12GB/512GB मॉडेल 6999 RMB (सुमारे 83,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल.

Xiaomi 12S चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 12S स्मार्टफोनमध्ये 6.28-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+, Dolby Vision, Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर आणि Adreno GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 12 आधारित MIUI 13 कस्टम स्किनवर चालतो.

Xiaomi 12S स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Bluetooth, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्ट मिळतो. हा 4,500mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे.

Xiaomi 12S स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX707 प्रायमरी सेन्सर मिळतो, जी 7P लेन्स आहे आणि अपर्चर f/1.9 ला सपोर्ट करते. हा प्रायमरी सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन फीचरसह येतो. त्याचबरोबर 13MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5MP मॅक्रो/टेलीमॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

Xiaomi 12S Pro चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 12 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+, Dolby Vision आणि Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये देखील Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर, Adreno GPU, 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. फोन Android 12 आधारित MIUI 13 कस्टम स्किनवर चालतो.

Xiaomi 12S स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Bluetooth, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्ट असे ओशन मिळतात. या फोनमध्ये Dolby Atmos, Dolby Vision, Hi-Res audio, आणि Harman Kardon स्पिकर देण्यात आले आहेत. यातील 4,600mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi 12S स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX707 सेन्सर आहे, जी 7P लेन्स आहे. हा सेन्सर अपर्चर f/1.9 आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. फोनमध्ये 50MP ची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 50MP चा थर्ड कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi 12S Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 12S Ultra स्मार्टफोन या सीरीजमधील सर्वात प्रीमियम आणि शक्तिशाली स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 6.73-इंचाचा AMOLED LTPO 2.0 डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2K आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. कर्व एज आणि पंच होल कटआउटसह येणारा हा डिस्प्ले Dolby Vision, HDR10+ आणि Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसह येतो. शाओमीच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर आणि Adreno GPU, 12GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज असे शक्तिशाली स्पेक्स मिळतात. हा फोन लेटेस्ट Android 12 आधारित MIUI 13 कस्टम स्किनवर चालतो.

Xiaomi 12S Ultra स्मार्टफोनमध्ये 4860mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तर कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Bluetooth, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Dolby Atmos, Dolby Vision, Hi-Res ऑडियो आणि Harman Kardon स्पिकरसह सादर करण्यात आला आहे.

Xiaomi 12S Ultra स्मार्टफोनमध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. परंतु यातील मुख्य कॅमेरा 1 इंच आकाराचा Sony IMX989 सेन्सर आहे, ज्याचे रिजोल्यूशन 50MP आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 48MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 48MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here