Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची एंट्री

Xiaomi 13 series अखेर चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro असे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. शाओमीच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये क्वॉलकॉमचा नवा आणि दणकट Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच यात 120Hz ओएलईडी डिस्प्ले, 120W फास्ट चार्जिंग आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पुढे आम्ही Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची किंमत आणि उपलब्धता

Xiaomi 13 च्या 8GB RAM व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 3999 (सुमारे 47,300 रुपये) पासून सुरु होते. तर 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB व्हर्जनची किंमत अनुक्रमे CNY 4299 (सुमारे 51,000 रुपये), CNY 4599 (सुमारे 55,000 रुपये), and CNY 4999 (सुमारे 59,200 रुपये) आहे. हा फोन Black, White, Wilderness Green आणि Far Mountain Blue कलर्समध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत

Xiaomi 13 Pro च्या 8GB+128GB असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत CNY 4999 (सुमारे 59,200 रुपये) आहे. तर 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB व्हर्जनची किंमत CNY 5399 (सुमारे 64,000 रुपये), CNY 5799 (सुमारे 68,700 रुपये), CNY 6299 (सुमारे 74,600) ठेवण्यात आली आहे.

Xiaomi 13 चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 13 मध्ये 6.36 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2400×1800 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, पंच-होल कटआऊट, HDR10+ आणि 1900 नीट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आणि Adreno GPU देण्यात आला आहे. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो.

कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी कंपनी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. Xiaomi 13 स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते, जी 67W वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस आणि 10W वायरलेस रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi आणि Leica यांनी Xiaomi 13 series मध्ये जबरदस्त कॅमेरा सिस्टम देण्यासाठी हातमिळवणी केली आहे. सीरिजमधील बेस मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50MP Sony IMX800 प्रायमरी सेन्सर, 10MP ची टेलीफोटो लेन्स आणि 12MP चा अल्ट्रा वाइड सेन्सरचा समावेश आहे. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi 13 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K ओएलईडी डिस्प्ले आहे, जो 3200×1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 1900 नीट्स पीक ब्राइटनेससह आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची ताकद दिली आहे आणि जोडीला Adreno GPU आहे. शाओमीच्या नव्या फ्लॅगशिपमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो.

Xiaomi 13 Pro मध्ये थोडीसी मोठी 4,820mAh ची बॅटरी मिळते, जी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS, NFC आणि USB Type-C चा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा, हाय-रेज ऑडिओ, X-axis linear motor आणि फोन गरम होऊ नये म्हणून व्हेपर चेंबर मिळतो. हे देखील वाचा: Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Pro मध्ये Leica ब्रॅंडिंगसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जो मोबाइल कॅमेरा सेन्सरमधील सर्वात मोठा एक इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. जोडीला 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP ची टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here