Xiaomi 13T एफसीसी साइटवर लिस्ट, स्पेसिफिकेशन्सची यादी आली समोर

Highlights

  • Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro लवकरच होऊ शकतो लाँच.
  • 13T मोबाइल एफसीसी सर्टिफिकेशनवर दिसला आहे.
  • ह्यात 12GB रॅम +256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

प्रीमियम स्मार्टफोन Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro लवकरच लाँच केले जाऊ शकतात. ह्या दोन्ही बद्दल गेल्या काही दिवसांत अनेक लीक समोर आले आहेत. आता 13T मोबाइल एफसीसी सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. तसेच हा फोन येत्या सप्टेंबर महिन्यात लाँच होऊ शकतो असं देखील सांगण्यात आलं आहे. पुढे लिस्टिंग, लाँच टाइमलाइन, संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती देण्यात आली आहे.

Xiaomi 13T एफसीसी लिस्टिंग

  • FCC लिस्टिंग नुसार Xiaomi 13T मॉडेल नंबर 2306EPN60G सह समोर आला आहे.
  • हा डिवाइस दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये येईल.
  • बेस मॉडेल 8GB रॅम +256GB इंटरनल स्टोरेज असेल. तर टॉप मॉडेलमध्ये 12GB रॅम +256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • सर्टिफिकेशनमध्ये हा फोन MIUI 14 वर चालेल, असं सांगण्यात आलं आहे .
  • तसेच FCC सर्टिफिकेशनमध्ये इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.

Xiaomi 13T लाँच डेट आणि किंमत (लीक)

लीकनुसार Xiaomi 13T फोन सर्वप्रथम ग्लोबली लाँच होईल. हा डिवाइस सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच होऊ शकतो. त्यानंतर हा भारतात येईल. Xiaomi 13T ची किंमत 599 युरो म्हणजे सुमारे 62,000 रुपये असू शकते. फोन ब्लॅक आणि अन्य ऑप्शनमध्ये येऊ शकतो.

Xiaomi 13T चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : लीकनुसार Xiaomi 13T मध्ये AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. डिस्प्ले साइजचा खुलासा झाला नाही, परंतु ह्या डिस्प्लेवर 144hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन मिळू शकतो.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये 4 नॅनोमीटर प्रोसेसवर आधारित चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत लिस्टिंगमध्ये सांगण्यात आलं आहे की डिवाइस 12GB पर्यंत रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येऊ शकतो.
  • कॅमेरा : फोनमध्ये Leica कॅमेरा देण्यात येईल जो Xiaomi 13 मध्ये दिसला होता.
  • बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • OS : डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित MIUI 14 वर चालू शकतो, अशी माहिती देखील लिस्टिंगमध्ये देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here