Xiaomi 13T Pro ची किंमत लाँचपूर्वीच Amazon वर लीक, जाणून घ्या फीचर्स

Highlights

  • Xiaomi 13T Pro ची किंमत लाँचपूर्वीच लीक झाली आहे.
  • शाओमीचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकतो.
  • किंमतसह फोनचे फीचर्सही लीक.

चिनी बाजारात आलेली प्रीमियम Xiaomi 13T Series लवकरच जागतिक बाजारात येत आहे. आता लाँचपूर्वीच ह्या स्मार्टफोन सीरीजच्या टॉप मॉडेलची किंमत ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लीक झाली आहे. तसेच याआधी काही स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक झाली होती. आता युरोपियन किंमत समोर आली आहे. ही स्मार्टफोन सीरीज 1 सप्टेंबरला ग्लोबल मार्केटमध्ये सादर Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro सह सादर केली जाऊ शकते.

लीक झालेली किंमत

Gizmochina नुसार, एका Amazon रिटेलरनं शाओमीचा हा प्रीमियम फोन चुकून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लिस्ट केला, ज्यात फोनची किंमतीसह प्रमुख फीचर्सचा खुलासा झाला आहे. लिस्टिंगमध्ये Xiaomi 13T Pro चा 12GB RAM + 512GB व्हेरिएंट दिसला आहे, ज्याची किंमत 799 पाउंड म्हणजे जवळपास 82,900 रुपये आहे. लिस्ट झालेला फोन Meadow Green कलर ऑप्शनमध्ये दिसला आहे.

Xiaomi 13T Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : शाओमीचा हा प्रीमियम फोन 6.67 इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्लेसह येऊ शकतो. फोनमध्ये पंच-होल डिस्प्ले डिजाइन मिळेल. या फोनचा डिस्प्ले 144Hz हाई रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • स्टोरेज आणि ओएस : Xiaomi 13T Pro मध्ये 12GB LPDDR5RAM आणि 512GB इंटरनल स्टोरेज मिळेल. हा फोन Android 13 वर आधारित MIUI 14 वर चालेल.
  • प्रोसेसर : ह्या फोनमध्ये MediaTek Dimensity 9200 चिपसेट मिळू शकतो. परंतु, कंपनीनं प्रोसेसरची माहिती दिली नाही.
  • कॅमेरा : शाओमीच्या ह्या स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ह्यात 108MP चा मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड आणि 5MP चा मॅक्रो कॅमेरा मिळेल. फोनचा कॅमेरा Leica ब्रँडिंगसह येऊ शकतो आणि OIS म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टेब्लायजेशन फीचरला सपोर्ट करेल. ह्या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
  • बॅटरी : Xiaomi 13T Pro मध्ये चार्जिंगसाठी 120W USB Type C वायर्ड चार्जर आणि 67W वायरलेस फास्ट चार्जर मिळू शकतो.
  • कनेक्टिव्हिटी : ह्यात कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth 5.3 सारखे फीचर्स मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here