Xiaomi 14 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, दमदार असेल हा स्मार्टफोन!

Highlights

  • शाओमी 14 स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 सह लाँच केला जाऊ शकतो.
  • Xiaomi 14 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

Xiaomi 13 गेल्यावर्षी डिसेंबर 2022 मध्ये लाँच झाला होता. हा फोन सर्वप्रथम चीनी मार्केटमध्ये आला होता आणि नंतर अन्य मार्केट्समध्ये उपलब्ध झाला होता. आता बातमी आली आहे की कंपनी ह्याच्या नेक्स्ट जेनरेशन अपग्रेडेड व्हर्जन Xiaomi 14 वर काम करत आहे जो पावरफुल आणि फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह लाँच होईल. लेटेस्ट लीकमध्ये शाओमी 14 ची बरीच माहिती समोर आली आहे जी तुम्ही वाचू शकता.

Xiaomi 14 स्पेसिफिकेशन्स (लीक)

Qualcomm Snapdragon 8 Gen 3

डिजीटल चॅट स्टेशननं शाओमी 14 चे स्पेसिफिकेशन्स लीक करत सांगितलं होतं की हा मोबाइल फोन क्वॉलकॉमच्या सर्वात अधिक शक्तिशाली चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 सह लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा क्वॉलकॉम प्रोसेसर आतापर्यंत बाजारात आला नाही आणि ह्याची निर्मिती सुरु आहे. हा चिपसेट मेकरचा सर्वात पावरफुल प्रोसेसर असेल जो स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चा अपग्रेड व्हर्जन आहे.

50MP Triple Rear Camera

लीक्सनुसार Xiaomi 14 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ह्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. हा 1/1.28 इंच लेन्स असलेला एक टेलीफोटो सेन्सर असेल. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देखील मिळेल. आशा आहे की फोनमध्ये मॅक्रो लेन्स देखील मिळू शकते. हा कॅमेरा सेटअप चौकोनी आकारात दिली जाऊ शकते ज्यात एलईडी फ्लॅशचा देखील समावेश असेल.

50W wireless charging

शाओमी 14 संबधित लिक्सनुसार हा मोबाइल फोन 4,860एमएएचच्या बॅटरीसह लाँच केला जाईल. जोडीला फोनमध्ये 90वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल. इतकेच नव्हे तर Xiaomi 14 50वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो.

1TB Storage

समोर आलेल्या लीक रिपोर्टनुसार शाओमी 14 स्मार्टफोनमध्ये 1टीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. बाजारात निवडक मोबाइल फोन असे आहेत ज्यात 1 टेराबाइट इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. भारतात अलीकडेच आलेल्या realme Narzo 60 Pro 5G मध्ये देखील 1टीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि ज्याची किंमत 29,999 रुपये आहे.

Xiaomi 14 कधी होईल लाँच?

शाओमीनं आतापर्यंत नवीन नंबर सीरीज बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. परंतु क्वॉलकॉमकडून स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 ऑक्टोबर महिन्यापर्यंत मार्केटमध्ये येईल. त्यामुळे जोवर प्रोसेसर येत नाही तोवर Xiaomi 14 देखील लाँच होणार नाही. ह्या फोनची एंट्री 2023 च्या अखेरीस होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here