Xiaomi 14 Ultra च्या लाँच पूर्वीच टायटेनियम स्पेशल एडिशन आणि स्टोरेज ऑप्शन आले समोर, जाणून घ्या डिटेल

Highlights

  • Xiaomi 14 Ultra मोबाइल MWC 2024 मध्ये येऊ शकतो.
  • याचे टायटेनियम एडिशन मॉडेल पण सादर केले जाऊ शकते.
  • डिव्हाइसमध्ये 16GB रॅम +1 टीबी स्टोरेज असू शकते.

शाओमी फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2024 इव्हेंटमध्ये Xiaomi 14 Ultra स्मार्टफोन बाजारात आणू शकते. याचे आयोजन बार्सिलोना मध्ये 25 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. परंतु आता काही दिवसाचा वेळ आहे याआधी ही 91 मोबाइल्सला या फ्लॅगशिप फोनची नवीन माहिती मिळाली आहे. याच्यानुसार हा टायटेनियम एडिशन आणि तीन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये सादर होऊ शकतो. चला, पुढे तुम्हाला एक्सक्लूसिव्ह इंफो माहिती मध्ये देत आहोत.

Xiaomi 14 Ultra titanium edition (लीक)

  • लीकनुसार Xiaomi 14 Ultra टायटेनियम फ्रेम सह लाँच केला जाऊ शकतो.
  • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी टायटेनियम स्पेशल एडिशन मोबाइल वर काम करत आहे. डिवाइस सामान्य मॉडेलमध्ये टायटेनियम फ्रेम मिळणार नाही. तर यासाठी स्पेशल एडिशन येईल.
  • हे पण सांगण्यात आले आहे की स्मार्टफोन तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात एंट्री घेऊ शकतो. ज्यात 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज, 16GB रॅम +512जीबी स्टोरेज आणि 16GB रॅम +1टीबी स्टोरेज असू शकते.

Xiaomi 14 Ultra इंडिया लाँच टाइमलाइन (लीक)

एका जुन्या लीकनुसार Xiaomi 14 Ultra भारतात पण लाँच होऊ शकतो. तसेच ग्लोबल बाजारात Xiaomi 14 सीरीज 25 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. परंतु अजून या सीरिजचे कोणते फोन बाजारात येणार आहेत याची माहिती मिळालेली नाही. तसेच, जागतिक लाँचवरून असे वाटत आहे की कंपनी भारतात पण आपल्या फ्लॅगशिप मॉडेल आणण्याच्या तयारीमध्ये आहे.

Xiaomi 14 Ultra चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: Xiaomi 14 Ultra मोबाइलमध्ये 6.7 इंचाचा क्वॉड कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या स्क्रीनवर 2K पिक्सल रिजॉल्यूशन, पंच-होल कटआउट डिजाइन आणि दमदार 144Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो.
  • प्रोसेसर: नवीन शाओमी मोबाइल परफॉरमेंससाठी क्वॉलकॉमच्या सर्वात लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 वर आधारित असण्याची शक्यता आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत हा शाओमी स्मार्टफोन 16जीबी पर्यंत रॅम +1टीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असलेला असू शकतो.
  • कॅमेरा: नवीन फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 1 इंच सेन्सर आणि LYT-900 50 मेगापिक्सल प्रायमरी, 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो, 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड आणि 50 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स दिली जाऊ शकते. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी Xiaomi 14 Ultra मध्ये 5,180एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. याला चार्ज करण्यासाठी 90 वॉट फास्ट चार्जिंग आणि 80 वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट मिळण्याची चर्चा आहे.
  • अन्य: Xiaomi 14 Ultra मध्ये धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP68 रेटिंग, सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सपोर्ट, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5जी, ब्लूटूथ, वायफाय सारखे अनेक फिचर्स दिले जाऊ शकतात.
  • ओएस: हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित ब्रँडच्या हायपरओएसवर आधारित ठेवला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here