10 जीबी रॅम सह लॉन्च झाला शाओमीचा हा बाहुबली फोन, याला तोड नाही

चीन मधील ऍप्पल म्हणून ओळखली जाणाऱ्या टेक कंपनीने भारतात जबरदस्त फॅन फॉलोइंग बनवली आहे. शाओमीने भारतातच नव्हे तर जगातील सर्वच बाजारांत कमी किंमती पासून हाई बजेट पर्यंत स्मार्टफोन सादर केले आहेत जे शानदार स्पेसिफिकेशन्स व फीचर्स सह येतात. आपल्या टेक्नॉलॉजीचा स्टार वाढवत शाओमीने अंर्तराष्ट्रीय मंचावर कंपनीचा दमदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. शाओमी ने हा स्मार्टफोन ब्लॅक शार्क हीलो (Black Shark Helo) नावाने लॉन्च केला आहे ज्यात 10जीबी रॅम आहे.

शाओमीला ब्लॅक शार्क हीलो ला ब्लॅक शार्क 2 पण म्हटले जाते. हा शाओमीचा खूपच खास गेमिंग स्मार्टफोन आहे जो कंपनी ने एप्रिल मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या ब्लॅक शार्क स्मार्टफोनचा नवीन वर्जन आहे. ब्लॅक शार्क हीलो म्हणजे ब्लॅक शार्क 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.01-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे.

ब्लॅक शार्क हीलो एंडरॉयड 9 पाई सह सादर करण्यात आला आहे जी कंपनीच्या लेटेस्ट मीयूआई सह चालतो. फोन मध्ये आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच विजुअल क्वॉलिटी आणि ग्राफिक्स चांगले करण्यासाठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू देण्यात आला आहे.

शाओमी ने आपला फोन 3 वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. ब्लॅक शार्क हीलो 10जीबी च्या पावरफुल रॅमला सपोर्ट करतो तसेच यात 256जीबी इंटरनल स्टोरेज देनाय्त आली आहे. तर दुसरा वेरिएंट 8जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच तिसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सोबत 128जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ब्लॅक शार्क हीलो डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

ब्लॅक शार्क हीलो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल बँड वाईफाई, ब्लूटूथ 5.0 व जीपीएस सारखे बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी यात फास्ट चार्जिंग सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता शाओमी ब्लॅक शार्क हीलो चा 6जीबी रॅम वेरिएंट 3199 युआन (जवळपास 34,000 रुपये), 8जीबी रॅम वेरिएंट 3499 युआन (जवळपास 37,000 रुपये) तर 10जीबी रॅम वेरिएंट 4199 युआन (जवळपास 44,500 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here