10 दिवस मोफत फोन चेक करेल Xiaomi, भारतात सुरु केला फ्री कस्टमर सर्व्हिस कॅम्प

Highlights

 • कस्टमर सर्व्हिस समर कॅम्प सुरु झाला आहे.
 • हा कॅम्प 1 ते 10 जून दरम्यान चालेल.
 • 100 टक्के फ्री फोन हेल्थ चेकअप करता येईल.

जर तुमच्या Xiaomi-Redmi मोबाइलमध्ये कोणतीही समस्या असेल तर कंपनी तुम्हाला फ्री चेकअप सर्व्हिस देत आहे. शाओमी इंडियानं भारतात दहा दिवसीय कस्टमर सर्व्हिस समर कॅम्प सुरु केला आहे ज्यात ब्रँडचे मोबाइल फोन्स विनाशुल्क चेक करवून घेता येतील. हे पूर्णपणे मोफत असेल आणि सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.

शाओमीचा फ्री फोन चेकअप कॅम्प

 • शाओमी कस्टमर सर्व्हिस समर कॅम्प 10 दिवस आयोजित झाला आहे.
 • हा कॅम्प 1 ते 10 जून दरम्यान चालेल.
 • 1000+ Xiaomi authorised service centres वर ही ऑफर सुरु आहे.
 • शाओमी आणि रेडमी दोन्ही सेग्मेंटचे स्मार्टफोन्स मोफत चेक करुवून घेता येतील.

  कोणत्या सुविधा मिळतील

  • कंपनी 100% मोफत हेल्थ चेकअप केलं जात आहे.
  • बॅटरी रिप्लेसमेंटवर लेबर चार्ज पूर्णपणे रद्द करण्यात आहेत.
  • बॅटरी रिप्लेसमेंटवर 50% सूट मिळेल.
  • डिस्प्ले रिप्लेसमेंट व अन्य सर्व्हिससाठी पैसे द्यावे लागतील, परंतु चेक-अप शुल्क घेतलं जाणार नाही.

  वॉरंटी देखील वाढवली

  Xiaomi नं काही दिवसांपूर्वी भारतात निवडक फोनसाठी 2 वर्षांच्या की वॉरंटी एक्सटेंडची घोषणा केली आहे. ह्यात फक्त 5 फोन्सचा समावेश आहे. तसेच लाभ घेण्यासाठी अनेक अटी शर्थी मान्य कराव्या लागतील. कंपनीनं घोषणा केली आहे की निवडक जुन्या फोन्सवर 2 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी मिळेल. ह्या स्मार्टफोन्समध्ये Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max, Mi 11 Ultra आणि Poco X3 Pro चा समावेश आहे. त्यामुळे सर्व फोनवर एक्सटेंडेड वॉरंटी मिळणार नाही. जर तुमच्या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्याची समस्या असेल किंवा मदरबोर्डमध्ये बिघाड असेल तर वॉरंटी अंतगर्त Xiaomi दुरुस्थी करेल. कंपनीनं एक्सटेंडेड वॉरंटीमध्ये अनेक नियम आणि अटी घातल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here