Categories: बातम्या

12जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला शाओमीचा दमदार मी 9 स्मार्टफोन

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने आज आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मी 9 सादर केला आहे. लॉन्चच्या आधीच शाओमीचे सीईओ ली जून आणि प्रेसिडेंट लिन बिन यांनी या फोनचे काही महत्वाचे फीचर सार्वजनिक केले होते. खाली आम्ही फोन संबंधित फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

शाओमी मी 9 ची किंमत
Mi 9 ची किंमत पाहता याच्या एंट्री-लेवल वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याची किंमत आरएमबी 2,999 (जवळपास 32,000 रुपये) आहे. तर याच्या 8जीबी + 128जीबी वेरिएंटची किंमत आरएमबी 3,299 (जवळपास 35,000 रुपये) आहे. त्याचबरोबर कंपनी ने मी 9 चा ट्रांसपेरेंट एंडिशन पण लॉन्च केला आहे जो 12जीबी रॅम+ 256जीबी स्टोरेज सह येतो. या वेरिएंटची किंमत आरएमबी 3,999 (जवळपास 42,300 रुपये) आहे. शाओमी मी 9 डीप स्पेस ग्रे, ग्रेडिएंट ब्लू आणि ग्रेडिएंट पर्पल कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

याव्यतिरिक्त कंपनी ने या इवेंट मध्ये वायरलेस चार्जिंग पावर बँक पण सादर केली आहे.10 वॉट पावर आउटपुट सह येणाऱ्या या चार्जिंग पावर बँकची किंमत आरएमबी 149 (जवळपास 1,580 रुपये) आहे. तसेच दुसऱ्या मॉडेल मध्ये 20 वॉट वायरलेस चार्जिंग आउटपुट आहे, ज्याची किंमत आरएमबी 169 (जवळपास 1,800 रुपये) आहे. तर स्टॅंडर्ड 20W क्यूई-अनुरूप वायरलेस चार्जिंग पॅडची किंमत आरएमबी 99 (जवळपास 1,050 रुपये) आहे.

रियलमी 3 लवकरच होईल लॉन्च, वीडियो आला समोर

हॅन्डसेट मध्ये 7एनएम प्रोसेस ने बनलेला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा एक ऑक्टाकोर प्रोसेसर आहे ज्याचा क्लॉक स्पीड 2.84 गीगाहर्ट्ज आहे. तसेच मी 9 मध्ये 6.39-इंचाचा सॅमसंग एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनुसार हा खूप वेगवान इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. यासाठी कंपनी ने यात थर्ड जेनरेशन इन डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर वापरला आहे.

शाओमी मी 9 वाटरड्रॉप नॉच सह येतो, ज्यात 24-मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर आहे. तसेच फोनच्या बॅकला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एक सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. सोबत मागील बाजूस 2एक्स ऑप्टिकल झूम असलेला 12-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे.

एयरटेलच्या दुप्पट 4जी स्पीड देत आहे जियो, जाणून घ्या इतर कंपन्यांची स्थिती

प्रोटेक्टिव कवर मधून 20 वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येणाऱ्या या फोन मध्ये 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन कनेक्टिविटी साठी यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5 मिलीमीटर ऑडियो जॅक, 4 जी वीओएलटीई, ब्लूटूथ आणि वाई-फाई सपोर्टचा समावेश आहे.

मी 9 एसई, ट्रांसपेरेंट/एक्सप्लोरर एडिशन चे स्पेसिफिकेशन्स
या इवेंट मध्ये कंपनी ने मी 9 ट्रांसपेरेंट एंडिशन ची घोषणा पण केली आहे. त्याचबरोबर ट्रांसपेरेंट एडिशन 40 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येतो. Mi 9 ट्रांसपेरेंट एडिशन मध्ये 12जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तर लो-एंड वेरिएंट मी 9 एसई मध्ये 5.97-इंच डिस्प्ले, 3,070एमएएच बॅटरी, 18 वॉट फास्ट चार्जिंग, 48एमपी + 8एमपी + 13एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 712 एसओसी आहे. तसेच यात 6जीबी रॅम आणि 64जीबी व 128जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे.

Published by
Siddhesh Jadhav