OnePlus 12R चा सेल झाला सुरू, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

Highlights

  • वनप्लस 12आर आजपासून खरेदीसाठी उपलब्ध आहे.
  • ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट आहे.
  • हा 16GB पर्यंत रॅम+ 256GB स्टोरेजसह आहे.


वनप्लस का फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 12R आज पासून सेलसाठी उपलब्ध झाला आहे. डिवाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन, कंपनी वेबसाइट आणि अन्य रिटेल स्टोर्स वर विक्रीसाठी तयार आहे. सेल दरम्यान डिव्हाइसवर जबरदस्त ऑफर्स मिळणार आहे. त्याचबरोबर मोबाइल घेतल्यावर ब्रँड OnePlus Buds Z2 मोफत मध्ये ऑफर करत आहे. परंतु हि ऑफर फक्त सीमित वेळासाठी आहे. चला, पुढे किंमत, सर्व ऑफर आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

OnePlus 12R ची किंमत आणि ऑफर्स

  • वनप्लस 12आर आजपासून अ‍ॅमेझॉन, वनप्लस स्टोर आणि अन्य रिटेल स्टोर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
  • हा दोन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लाँच केला गेला होता याच्या 8GB रॅम + 128GB मॉडेलची किंमत 39,999 रुपये आहे तर 16GB रॅम + 256GB स्टोरेज 45,999 रुपयांचा आहे.
  • ऑफर्स पाहता वनप्लस 12आर वर युजर्सना 4,999 रुपयांची किंमत असणारा वनप्लस बड्स झेड2 मोफत मिळेल. परंतु हा ऑफर्स फक्त सिमित वेळासाठी म्हणजे 6 फेब्रुवारी पर्यंत आहे.
  • युजर्स आयसीआयसीआय बँक कार्ड आणि वनकार्ड खरेदीवर 1000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट पण मिळू शकतो.

OnePlus 12R वर ईएमआय ऑफर्स

  • ब्रँड OnePlus 12R मोबाइलच्या दोन्ही मॉडेल्सवर ईएमआय ऑफर करत आहे.
  • यात तुम्हाला 6 महिन्याच्या नो कॉस्ट EMI चा लाभ मिळेल.
  • स्मार्टफोनला नो कॉस्ट ईएमआय वर घेण्यासाठी तुम्हाला मात्र 2,927 रुपयांची मासिक हफ्ता द्यावा लागणार आहे.

OnePlus 12R चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: OnePlus 12R मोबाइलमध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED ProXDR 10-बिट LTPO 4.0 पॅनल देण्यात आला आहे. यावर 2780 × 1264 पिक्सल रिजॉल्यूशन, 450ppi पिक्सल डेंसिटी, 120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट, 4500निट्स पीक ब्राइटनेस, 2160Hz PWM डिमिंग, डॉल्बी व्हिजन, HDR10+, आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 का प्रोटेक्शन मिळत आहे.
  • प्रोसेसर: फोनमध्ये जबरदस्त परफॉरमेंससाठी हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट आणि इंटीग्रेटेड एड्रेनो 740 जीपीयू सोबत येतो.
  • मेमरी: डेटा स्टोर करण्यासाठी फोन 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह ठेवला गेला आहे.
  • कॅमेरा: फोनमध्ये ब्रँड नं ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ओआयएस सह 50 एमपी चा सोनी आयएमएक्स890 प्रायमरी सेन्सर, 8 एमपी अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि एक 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ईआईएस सह 16 एमपी कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत डिवाइस दमदार 5,500mAh आणि 100W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आहे.
  • ओएस: OnePlus 12R लेटेस्ट Android 14 आधारित OxygenOS 14 वर आधारित ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here