Samsung Galaxy A55 5G फोन परत झाला सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट, फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची मिळाली माहिती

सॅमसंग बद्दल मागच्या अनेक दिवसांमध्ये बातम्या समोर येत आहे की कंपनी आपला गॅलेक्सी ‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Samsung Galaxy A55 5G नावाने लाँच होईल. काही दिवसांमध्ये सॅमसंग 5जी फोनच्या अनेक लीक समोर आले आहेत ज्यामध्ये याचे स्पेसिफिकेशन्स पण शेअर झाले आहेत. तसेच आता हा अपकमिंग सॅमसंग स्मार्टफोन FCC database वर स्पॉट झाला आहे जो मोबाइल लाँच होणार असल्याचे दर्शवत आहे.

Samsung Galaxy A55 5G FCC डिटेल

सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोनला एफसीसी डेटाबेस मध्ये SM-A556E/DS मॉडेल नंबरसह दाखवण्यात आले आहे. तसेच डीएस म्हणजे Dual Sim ला सपोर्ट आहे. हा फोन A3LSMA556E FCC ID मिळाला आहे. तसेच फोनमध्ये चार्जिंगसाठी EP-TA800 मॉडेल अडेप्टर दिला जाणार असल्याचे एफसीसी वर समोर आले आहे जो गॅलेक्सी ए55 5जी फोनमध्ये 25W Fast Charging टेक्नॉलॉजीसह दिले जाणार आहे.

Samsung Galaxy A55 5G भारतातील लाँच किंमत (अनुमानित)

सॅमसंगनं आतापर्यंत आपल्या या आगामी स्मार्टफोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण गॅलेक्सी ए55 5जी फोन फेब्रुवारीच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये किंवा मार्चच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तसेच किंमत पाहता Samsung Galaxy A55 5G किंमत 40 हजार रुपयांच्या रेंजमध्ये ठेवला जाणार असल्याची अपेक्षा केली जात आहे. फोनच्या लाँचची तारीख आणि किंमतसाठी अजून ऑफिशियल घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.

Samsung Galaxy A55 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.5″ 120Hz AMOLED Display
  • Exynos 1480 SoC
  • 50MP Rear Camera
  • 32MP Selfie Camera
  • 25W 5,000mAh Battery
  • स्क्रीन: सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोनला 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार पंच होल स्टाइल असणारी ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनणार आहे तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करेल.
    परफॉर्मन्स : हा सॅमसंग फोन अँड्रॉइड 14 ओएसवर लाँच केला जाऊ शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी गॅलेक्सी ए55 5जी फोनमध्ये सॅमसंगचा ही एक्सनास 1480 ऑक्टाकोर प्रोसेसर पाहायला मिळू शकतो.
  • फ्रंट कॅमेरा: सेल्फी काढणे, रिल्स बनविणे तसेच व्हिडिओ कॉलिंग इत्यादीसाठी Samsung Galaxy A55 5G फोनला 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात उतरविले जाणार आहे. हा सेल्फी कॅमेरा एआय फिचर्ससह असू शकतो.
  • बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ह्याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल मेन सेन्सर, 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए55 5जी फोनला 5,000एमएएच बॅटरीसह केला जाऊ शकतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here