32MP फ्रंट कॅमेरा आणि या शानदार प्रोसेसर सह लॉन्च झाला Mi A3, फीचर्स आहेत कमालीचे

चाइनीज स्मार्टफोन कंपनी शाओमी ने आज भारतीय मार्केट मध्ये आपला एंडरॉयड वन ओएस बेस्ड डिवाइस Mi A3 लॉन्च केला आहे. लॉन्चच्या आधी डिवाइस बद्दल कंपनीने खूप टीज केला होता, त्यावर आता पूर्णविराम लागला आहे. फोन ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया वर सेल केला जाईल. कंपनीनुसार Mi A3 जगातील पहिला डिवाइस आहे जो ट्रिपल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येतो.

किंमत आणि उपलब्धता

Xiaomi Mi A3 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे, ज्यात 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरीचा समावेश आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Mi A3 च्या 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर 6जीबी रॅम व 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. फोन कंपनी ने Not Just Blue, More Than White आणि Kind of Grey रंगात सादर केला आहे. डिवाइसचा सेल अमेझॉन इंडिया आणि मी.कॉम मध्ये 23 ऑगस्टला केला जाईल.

डिस्प्ले आणि डिजाइन

फोन मध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. शाओमीच्या या स्मार्टफोन मध्ये 6.08 इंचाचा एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजॉलूशन 720×1520 पिक्सल आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे आणि फोनच्या वर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

रॅम व स्टोरेज

कंपनीने हा एंडरॉयड वन हँडसेट दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे. या फोन मध्ये 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी आहे. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

कॅमेरा सेगमेंट

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात एफ/1.79 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, वाइड-एंगल लेंस सह 8-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि डेप्थ सेंसिंग साठी 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

ओएस व प्रोसेसर

कंपनीने Mi A3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

फोन मध्ये पावर बॅकअप साठी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,030एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कनेक्टिविटी साठी फोन मध्ये 4G VoLTE, जीपीएस/ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी, वाई-फाई, ब्लूटूथ आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक सारखे ऑप्शन पण देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here