5,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह जुलै मध्ये लॉन्च होईल शाओमी मी मॅक्स 3

शाओमी सीईओ लेई जून ने मागच्या महिन्यात चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक कमेंट केली आहे ज्यात मी मॅक्स 3 चा उल्लेख करण्यात आला होता. या पोस्ट वर सीईओ ने खुलास केला होता की शाओमी आपल्या नवीन डिवाईस मी मॅक्स 3 वर काम करत आहे आणि हा फोन जुलै महिन्यात टेक बाजारात येऊ शकतो. सीईओ ने आपल्या विधानात मी मैक्स 3 च्या लॉन्च ची बातमी दिली होती तर आता या फोन चे स्पेसिफिकेशन्स पण लीक माध्यमातून समोर आले आहेत.

शाओमीचा हा आगामी डिवाईस मी मॅक्स 3 चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर दिसला होता. वेबसाइट वर मी मॅक्स 3 च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे. लीक नुसार शाओमी चा हा फोन पण 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल. या फोन मध्ये 6.99-इंचाचा मोठा फुलएचडी+ एलसीडी ​डिस्प्ले मिळू शकतो. पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 10 सह सादर केला जाऊ शकतो त्याचबरोबर हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल.

वेईबो पोस्ट नुसार शाओमी हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करेल, ज्यात 4जीबी तसेच 6जीबी रॅम आॅप्शन असतील. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या लीक मध्ये हे दोन्ही वेरिएंट 3जीबी रॅम व 64जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम व 128जीबी मेमरी सह येतील असे सांगण्यात आले होते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वेईबो नुसार या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा असेल. फोन चा प्राइमरी रियर कॅमेरा 20-मेगापिक्सल चा सोनी आईएमएक्स63 सेंसर असेल तर सेकेंडरी कॅमेरा बद्दल माहिती देण्यात आली नाही. त्याचप्रमाणे फोन च्या सेल्फी कॅमेरा ची पण माहिती मिळाली नाही.

शाओमी मी मॅक्स 3 बद्दल सांगण्यात आले आहे की या फोन मध्ये 5,500एमएएच ची मोठी पावरफुल बॅटरी असेल जी क्विक चार्ज 3.0 टेक्निक ला सपोर्ट करेल. शाओमी ने या फोन चे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत त्यामुळे शाओमी च्या घोषणेची वाट बघितली जात आहे. जो पर्यंत शाओमी मी मॅक्स 3 बद्दल काही बोलत नाही तोपर्यंत वेईबो द्वारा दिलेल्या या स्पेसिफिकेशन्स वर विश्वास ठेवता येणार नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here