Realme 5 Pro आता विकला जाईल रिटेल स्टोर्स वर पण, जाणून घ्या फोनची ऑफलाईन किंमत

Realme ने गेल्या महिन्यात भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन डिवाईस Realme 5 आणि Realme 5 Pro लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन रियलमी ब्रँडचे असे पहिले स्मार्टफोन होते जे क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीने तीन वेरिएंट मध्ये लॉन्च केले होते जे आतापर्यंत फक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येत होते. पण आता आपल्या फॅन्सना भेट देत Realme ने Realme 5 Pro ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर पण सेल साठी उपलब्ध केले आहेत. म्हणजे हा शानदार स्मार्टफोन आता जवळच्या रिटेल स्टोर वरून पण विकत घेता येईल.

अशी असेल नवीन किंमत

Realme 5 Pro भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे ज्यात 4 GB + 64 GB, 6 GB + 64 GB आणि 8 GB + 128 GB चा समावेश आहे. कंपनीने या फोनची ऑफलाईन किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. Realme 5 Pro चा 4 जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर हा 14,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

त्याचप्रमाणे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर Realme 5 Pro चा 6 जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे पण ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर हा वेरिएंट 15,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. Realme 5 Pro चा सर्वात मोठा 8 जीबी रॅम वेरिएंट कंपनीने 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता, पण आता ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर हा फोन वेरिएंट 17,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 5 Pro

Realme 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा Realme 5 पेक्षा वेगळा आहे. यात 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 712 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. हँडसेट कंपनीने तीन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 4+64GB, 6+64GB, 8+128GB वेरिएंटचा समावेश आहे.

फोटोग्राफी साठी Realme 5 Pro मध्ये पण चार सेंसर आहेत. यात 48+8+2+2एमपी कॅमेऱ्यांचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह 4,035mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here