सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo X60 Pro+ फोन, Samsung Galaxy S21 ला देईल टक्कर

Vivo ने गेल्या महिन्यात आपली नवीन फ्लॅगशिप सीरीज ‘एक्स60’ सादर केली होती केला होता, ज्यात Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते. आता हे दोन्ही ताकदवान स्मार्टफोन्स लॉन्च केल्यानंतर वीवोने टेक मार्केट मध्ये Vivo X60 Pro Plus आणला आहे. फोन कंपनीने सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा स्पेसिफिकेशन्स सह सादर केला आहे. फीचर्स आणि लुकच्या बाबतीत वीवोचा हा प्रीमियम स्मार्टफोन मार्केट मधील Samsung Galaxy S21 सीरीज स्मार्टफोन आणि iPhone 12 सीरीजला आव्हान देईल.

डिजाइन

लुक आणि डिजाइनच्या बाबतीत हा फोन या सीरीजच्या दोन्ही जुन्या फोन्स सारखाच आहे. या फोनच्या फ्रंटला मध्यभागी पंच होल कटआउट देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. सोबतच फोनच्या कडा बेजललेस आहेत. फोन्सच्या खालच्या बाजूला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि ऑन-ऑफ बटन आहे. मागील लुक पाहता यात क्वाड कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश सह ऑप्टिकल लेंस आहे.

Vivo X60 Pro Plus

सर्वात ताकदवान प्रोसेसर

तुम्हाला सांगू इच्छितो कि वीवो एक्स 60 सीरीज मध्ये X60 Pro Plus सर्वात प्रीमियम फोन आहे. या डिवाइस मध्ये 2.84GHz स्नॅपड्रॅगॉन 888 देण्यात आला आहे. हा प्रोसेसर पाहता यात 25 टक्के फास्ट CPU परफॉर्मन्स आणि 35 टक्के जास्त फास्ट ग्राफिक्स सह 7.5 Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळतो. तसेच यात क्वॉलकॉमच्या 6th जेनरेशन AI इंजन सह Hexagon 780 AI आहे.

हे देखील वाचा : 10 दिवसांत चौथा फोन घेऊन आली वीवो, आज लाॅन्च केला 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला Vivo Y31 स्मार्टफोन

दमदार कॅमेरा

Vivo X60 Pro+ मध्ये असलेला क्वाड कॅमेरा पाहता या सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 50MP Samsung GN1 सेंसर आहे, जो लो लाइट फोटो आणि विडियो शूटसाठी खूप शानदार असल्याचे बोलले जाते. तसेच फोन मध्ये 48MP Sony IMX598 सेंसर, 2x optical zoom सह 32MP ची टेलिफोटो लेंस आणि 5x hybrid optical zoom सह 8MP periscope कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo X60 Pro Plus

स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 Pro+ मध्ये 6.56 इंचाचा Full-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची स्क्रीन रिजॉल्यूशन 2376×1080 पिक्सल आहे. त्याचबरोबर फोनचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्मार्टफोन दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे, ज्यात 8 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरियंट आणि 12 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरिएंटचा समावेश आहे.

फोन अँड्रॉइड 11 बेस्ड OriginOS 1.0 वर काम करेल. या वीवो फोन मध्ये 4200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 55 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि हा फुल चार्ज होण्यास फक्त 45 मिनिटे लागतात. फोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, हाई-फाय ऑडियो, टाइप-सी पोर्ट आणि 5जी सपोर्ट आहे.

हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी आणि 6GB सह लॉन्च झाला Vivo Y20G, जाणून घ्या किंमत

किंमत

Vivo X60 Pro+ ची किंमत पाहता याच्या 8 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 4,999 युआन (जवळपास 56,399 रुपये) आणि 12 GB RAM + 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,998 युआन (जवळपास 67,659 रुपये) आहे. चीन व्यतिरिक्त हा फोन दुसऱ्या मार्केट्स मध्ये कधी येईल याबाबत पण कोणतीही माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here