Xiaomi Redmi 7A कि Realme C2, कोणता फोन आवडला तुम्हाला

Xiaomi ने आज भारतात Redmi 7A मॉडेल सादर केला आहे. हा फोन गेल्याच महिन्यात चीन मध्ये लॉन्च केला गेला होता पण आता हा भारतात आला आहे. जरी फोनचे स्पेसिफिकेशन आणि किंमत चांगली असली तरी ज्याप्रकारचे दावे कंपनी आधी करत होती ते खरे ठरले नाहीत. कारण कंपनी म्हणत होती कि या फोन मध्ये असे फीचर्स आहेत जे 20,000 रुपयांच्या फोन मध्ये उपलब्ध आहेत पण लॉन्च नंतर असे काहीच दिसले नाही. हा एक साधारण फोन आहे जो चांगल्या स्पेसिफिकेशन सह उपलब्ध आहे. तसेच भारतीय बाजारात काही फोन आधीच उपलब्ध आहेत जे याला चांगलीच टक्कर देऊ शकतात ज्यात सर्वात आधी Realme C2 चे नाव येते. याच कारणामुळे Xiaomi Redmi 7A लॉन्च होताच Realme च्या सीईओ ने त्या फोन मधील दोष दाखवलाय सुरवात केली.त्यामुळे खरंच Realme C2 बेस्ट आहे कि Redmi 7A वरच विश्वास ठेवावा असा प्रश्न उद्भवतो! चाल तर मग एका छोट्याश्या कम्पॅरिजन आपण दोन्ही फोन तपासून बघूया कि डिजाइन आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावर कोण आहे बेस्ट.

डिजाइन

Xiaomi Redmi 7A कंपनीने पॉलीकार्बोनेट बॉडी सह सादर केला आहे. जुन्या फोनची डिजाइन पण काहीशी अशीच होती. तसेच अलीकडेच लॉन्च झालेला रेडमी गो फोन पण असाच होता. बिल्ट क्वालिटी चांगली आहे पण डिजाइन मध्ये नावीन्य नाही. फोन कॉम्पॅक्ट आहे आणि सहज हातात बसतो.

तसेच Realme C2 पाहता हा दिसायला खूप स्मार्ट आहे. फोनची बॉडी पॉलीकार्बोनेटची आहे पण ग्लास फिनिश मध्ये आहे त्यामुळे हा तुम्हाला जास्त चांगला वाटेल. इतकेच नव्हे तर मागील डायमंट कट पॅटर्न मुळे हा दुसऱ्या फोन पेक्षा वेगळा दिसतो. एकंदरीत डिजाइनच्या बाबतीत हा जास्त चांगला आहे.

डिस्प्ले

Xiaomi Redmi 7A मध्ये 5.45-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे आणि कंपनीने हा 18:9 आसपेक्ट रेशियो वाले फुल व्यू डिस्प्ले सह सादर केला आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 720 x 1440 पिक्सल आहे आणि डेंसिटी 295 पीपीआई आहे. डिस्प्ले बद्दल कोणतीही तक्रार नाही. या रेंज मध्ये हे रेजल्यूशन खूप चांगले आहे.

Realme C2 मध्ये 6.1-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 720 x 1560 पिक्सल आहे आणि हा 282 पीपीआई पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो. सर्वात मोठी बाब अशी कि कंपनीने हा 19:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि या फोन मध्ये तुम्हाला वाटर ड्रॉप नॉच मिळेल जी सध्या या रेंज मध्ये नाही. त्यामुळे असे म्हणता येईल डिस्प्लेच्या बाबतीत पण रियलमी पुढे गेली आहे.

हार्डवेयर

Redmi 7A क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर सादर केला गेला आहे. सोबतच फोन मध्ये 2.0 गीगाहर्ट्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. कंपनीने हा 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी आणि 2जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये सादर केला आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी पर्यंत हि वाढवू शकता.

C2 मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 2 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. हा फोन 2जीबी आणि 3जीबी रॅम मेमरी सह येतो. तसेच डेटा स्टोरेज साठी 16जीबी आणि 32जीबी ची स्टोरेज आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे.

इथे दोन्ही फोन जवळपास एकसारखे दिसतात पण आपल्या स्टेबल परफॉर्मेंसमुळे क्वालकॉम चिपसेट जास्त चांगला म्हणता येईल. त्यामुळे रेडमी 7ए पुढे जातो.

कॅमेरा

फोटोग्राफी साठी Redmi 7A च्या रियर पॅनल वर 12 मेगापिक्सलचा सोनीIMX 486 सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे जो AI फेस अनलॉक सपॉर्ट सह येतो.

Realme C2 डुअल रियर कॅमेऱ्यासह सादर केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फी साठी या फोन मध्ये 5मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

रियलमी सी2 मध्ये जरी डुअल कॅमेरा सेटअप दिला गेला असेल तरी कॅमेरा सेंसर रेडमीचा बेस्ट आहे. सोनीच्या या सेंसरचा वापर महाग फोन मध्ये केला जातो. त्यामुळे इथे रेडमी पुढे गेली आहे.

ऑपरेटिंग सिस्टम

दोन्ही फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर चालतात पण यूआई वेगळा आहे. रियमली सी2 मध्ये तुम्हाला कलरओएस 6.0 मिळेल तर रेडमी 7ए MIUI 10 वर आधारित आहे. मीयूआई कलरओएस पेक्षा खूप पुढे आहे यात शंकाच नाही. त्यामुळे इथेपण रेडमी 7ए जिंकत आहे.

कनेक्टिविटी

दोन्ही फोन मध्ये 4जी सपोर्ट आहे आणि डुअल सिम देण्यात आला आहे. सोबतच वाईफाई ब्लूटूथ पण मिळेल. तसेच डेटा डाटा ट्रांसफर व चार्जिंग साठी माइक्रो यूएसबी 2.0 आहे. दोन्ही पैकी कोणत्याही फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नाही पण फेस अनलॉक आहे. त्यामुळे कोणीही पुढे किंवा मागे नाही असे म्हणता येईल.

बॅटरी

पावर बॅकअप साठी शाओमी रेडमी 7ए मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही.

रियलमी सी2 मध्ये पण तुम्हाला 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल.

प्राइस

शाओमी रेडमी 7ए चा 2जीबी + 16जीबी वाल्या मॉडेलची किंमत 5,999 रुपये आहे. तर 2जीबी 32जीबी वाला फोन 6,199 रुपयांचा आहे. तसेच जून पर्यंत हे 200 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येतील. अर्थात 5,999 रुपयांचा फोन 5,799 रुपयांमध्ये आणि 6,199 रुपयांचा फोन 5,999 रुपयांमध्ये .

रियलमी सी2 ची सुरवाती किंमत 5,999 रुपये आहे तर 3जीबी + 32जीबी वाला मॉडेल 6,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या प्राइस मध्ये हा चांगला फोन आहे. परंतु माझ्या मते बेस्ट दिल रेडमी 7ए 2जीबी + 32जीबी ची आहे. 6,199 रुपयांमध्ये याची बरोबरी कोणी करू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here