OnePlus 12 मध्ये मिळू शकतो 50MP+50MP+64MP कॅमेरा! प्रोसेसरचं नाव देखील आलं समोर

Highlights

  • OnePlus 12 आधी चीनमध्ये लाँच होईल.
  • ह्यात सर्वात शक्तिशाली क्वॉलकॉम प्रोसेसर मिळेल.
  • फोन 100वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

OnePlus 12 संबंधित मोठं लीक समोर आलं आहे ज्यात फोनच्या कॅमेरा सेन्सर, प्रोसेसर आणि डिस्प्लेसह बॅटरी तसेच चार्जिंग टेक्नॉलॉजीची माहिती समोर आली आहे. ही महत्वाची माहिती टिपस्टर योगश बरारच्या हवाल्याने देण्यात आली आहे. योगेशनं ट्वीटच्या माध्यमातून वनप्लस 12 चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. चला जाणून घेऊया वनप्लसच्या आगामी फ्लॅगशिपची लीक माहिती.

वनप्लस 12 चे लीक्ड स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ QHD 120Hz OLED Display
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 3
  • 50MP + 50MP (UW) + 64MP (periscope)
  • 100W 5,000mAh battery

स्क्रीन : समोर आलेल्या माहितीनुसार वनप्लस 12 5जी फोनमध्ये 6.7 इंचाची मोठी स्क्रीन दिली जाईल. लीकनुसार हा क्वॉड एचडी रिजोल्यूशन डिस्प्ले असेल जो क्यूओएलईडी पॅनलवर बनला असेल. तसेच OnePlus 12 मध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेट देखील मिळू शकतो.

प्रोसेसर : OnePlus 12 पावरफुल मोबाइल प्रोसेसरसह लाँच केला जाईल, हे सर्व टेकप्रेमींना माहित असेल. आता लीकमध्ये माहिती समोर आली आहे की ह्या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट दिला जाईल. विशेष म्हणजे क्वॉलकॉमनं अद्याप हा चिपसेट ऑफिशियल केला नाही.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी वनप्लस 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. लीकनुसार ह्या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल जोडीला 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 64 मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स असेल.

बॅटरी आणि चार्जिंग : पावर बॅकअपसाठी ह्या वनप्लस फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी Oneplus 12 मध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते, असं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे.

वनप्लस 12 लाँच टाइमलाईन

सर्वप्रथम स्पष्ट झालं आहे की OnePlus 12 मार्केटमध्ये येण्यास खूप वेळ आहे. नवीन लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन डिसेंबरपर्यंत बाजारात येईल. हा स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल नंतर भारत व इतर बाजारांत येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here