सिंगल चार्जवर 100km चा प्रवास! बॅटरीवर चालणारी ENGWE X26 बाईक आली बाजारात

चीनमधील प्रमुख ई-व्हेईकल्स कंपनी ENGWE नं ई-बाईक (Electric Bike) सेग्ममेंट मध्ये आपला नवा मॉडेल सादर केला आहे. कंपनीनं इलेक्ट्रिक सायकल ENGWE X26 लाँच केली आहे, जी सिंगल चार्जवर 100 किलोमीटरची रेंज देते. इतकी रेंज खूप कमी बाईकमध्ये मिळते. या बॅटरी असलेल्या सायकलच्या लाँचच्या वेळी कंपनीनं म्हटलं होत की, ही रफ अँड व्हर्सटाईल राईड असलेली बाईक आहे जिची डिजाइन लोकांना नक्की आवडेल. तसेच हिचा टॉप स्पीड, रेंज आणि क्वॉलिटी देखील खूप खास आहे. पुढे आम्ही या ई-बाईकच्या किंमत, वैशिष्टये आणि सर्व फीचर्सची माहिती दिली आहे.

लुक व डिजाइन

ENGWE X26 च्या लुक व डिजाइनच्या बाबतीत कंपनीनं खूप काळजी घेतल्याचं दिसून येतं. ही ई-बाईक शहरात तसेच ऑफ-रोड अशा दोन्ही ठिकाणच्या प्रवासासाठी डिजाइन करण्यात आली आहे. या ई-बाईकमध्ये देण्यात आलेले टायर 4 इंच जाडे आणि यांचा आकार 26 इंच इतका आहे. इतकेच नव्हे तर, X26 ची पावरफुल फ्रेम मोठी पेलोड कपॅसिटी देते. या ई-बाईकमध्ये मागे अजून एक प्रवासी बसण्यासाठी अतिरिक्त जागा आहे.

हिच्या फ्रंट, मिडिल आणि रियर सस्पेंशनमुळे आरामदायक राईडिंगचा अनुभव घेता येतो. तसेच ENGWE च्या मते, X26 ची यूनिक स्टाईलमुळे एक वेगळी डिजाइन बाजारात आली आहे. या बाईकच्या सस्पेंशनमध्ये एयर, मेकॅनिकल शॉक आणि सामान्य सस्पेंशन देण्यात आलं आहे.

रेंज, टॉप स्पीड आणि अन्य फीचर्स

पावर आणि स्पेसिफिकेशन्स सोबतच या ENGWE X26 ची रेंज आणि टॉप स्पीड देखील तितकीच कमाल आहे. कंपनीच्या साईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार या ई-बाईकमध्ये 750W इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, जी 1,000W पीकवर पोहोचू शकते. तसेच, यात रायडरला ताशी 50km चा टॉप स्पीड मिळतो. तसेच, यात नॉर्मल, स्पोर्ट आणि असिस्ट राईडिंग असे तीन राईडिंग मोड उपलब्ध आहेत.

रेंज बद्दल बोलायचे झाले तर नॉर्मल मोडमध्ये जवळपास 100 किमी (57.7 माइल्स) पर्यंतची रेंज मिळते. तसेच वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे की, ENGWE X26 मध्ये एक प्रायमरी बिल्ट-इन बॅटरी आणि एक सेकंडरी रिमूवेबल 9.6Ah ची बॅटरी आहे. ही यूनिक बॅटरी चार्ज केली जाऊ शकते आणि बदलली जाऊ शकते, त्यामुळे या ई-बाईकला एक्स्ट्रा रेंज मिळते.

किंमत

या ई-बाईकची किंमत पाहता IndieGoGo च्या माध्यमातून ही बाईक 1,600 डॉलर(सुमारे 1,26,370 रुपये) च्या डिस्कॉउंटेड किंमतीत कंपनीनं सादर केली आहे. X26 साठी Indiegogo वर कँपेन या महिन्याच्या सुरुवातीला सुरु करण्यात आलं आहे. या बाईकची शिपिंग ऑगस्ट 2022 मध्ये सुरु होईल. ही युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि युरोपमधून विकत घेता येईल. भारतात मात्र ही ई-बाईक मिळणं सध्यातरी शक्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here