16 वर्षांच्या मुलाने केला अॅप्पलचा सर्वर हॅक, सर्वात सुरक्षित असल्याचा दावा ठरला फोल

अॅप्पल जगातील त्या निवडक ब्रँड पैकी एक आहे जो फक्त हाई स्टेटसशी जोडला जात नाही तर त्यांचे प्रोडक्ट्स टेक विश्वातील सर्वात सुरक्षित आणि विश्वासकारक म्हणून ओळखले जातात. आपल्या ओळखी प्रमाणे अॅप्पल पण आपल्या यूजर्स ची खास काळजी घेतो आणि त्यांच्या डेटा सुरक्षेची पण काळजी घेतो. अॅप्पल चे फॅन जगभरात आहेत पण एका अॅप्पल फॅन ने अॅप्पल सर्वर हॅक करून जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या फॅनचे वय तसे तर फक्त 16 वर्ष आहे पण त्याने अॅप्पल सर्वर हॅक करून अॅप्पल कंपनी सोबतच एफबीआई ला पण धक्का दिला आहे.

16 वर्षीय या हॅकरला आम्ही अॅप्पल फॅन म्हणत आहोत कारण या मुलाला अॅप्पल मध्ये काम करायचे होते. या 16 वर्षीय मुलाचे स्वप्न जगातील प्रतिष्ठित कंपनी अॅप्पल मध्ये काम करण्याचे होते, पण त्याने अॅप्पल सर्वरच हॅक करून संपूर्ण टेक जगाला धक्का दिला आहे. झाले असे की आस्ट्रेलिया मध्ये राहणार्‍या एका 16 वर्षीय मुलाने घर बसल्या अॅप्पल सर्वर हॅक केला आणि कंपनी सर्वर वरून अॅप्पल यूजर्सचा 90 जीबी पेक्षा जास्त डेटा मिळवला.

मीडिया रिपोर्ट नुसार 16 वर्षाच्या एका मुलाने अॅप्पल सर्वर मध्ये जाऊन खाजगी माहिती व पासवर्ड्स सह काही महत्वाचा डेटा हॅक केला आहे. हैराणीची बाब म्हणजे अॅप्पल सर्वर वरून डेटा चोरताना कंपनीला याची खबर पण लागली नाही अणि या मुलाची ओळख पूर्णपणे गुप्त राहिली. या किशोरवयीन मुलाने या डेटाचा स्क्रीनशॉट घेऊन आपल्या मित्रांसोबत व्हाट्सॅप वर शेयर पण केला.

अॅप्पल ने मान्य केले आहे की त्यांच्या सर्वर मध्ये घुसखोरी झाली आहे पण अॅप्पल चे म्हणणे आहे की कोणत्याही यूजरचा पर्सनल डेटा चोरी झालेला नाही. हॉकिंग चे गांभीर्य समजून अॅप्पल ने सरळ एफबीआई (फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन) शी संपर्क साधला आणि हॅकिंग ची तक्रार केली. तपसा केल्या नंतर एफबीआई ने हे प्रकरण ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांकडे दिले आणि मग या एजेंसी ने या मुलाला ट्रॅक करून त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली.

रिपोर्ट नुसार मुलाच्या घरावर छापा मारल्यानंतर दोन लॅपटॉप, एक मोबाईल फोन आणि एक हार्ड ड्राइव मिळाली. मुलाचा भोळेपणा तर बघा, त्याने आपल्या लॅपटॉपच्या डेस्कटॉप वरच ‘हॅक, हॅक हॅक’ नावाने फोल्डर बनवून त्यातच हॅक केलेला सर्व डेटा सेव केला होता. सुरक्षा एजेंसी ने मुलासोबत त्याच्या सर्व सामना वर कब्जा केला आणि सिद्ध केले की या 16 वर्षीय मुलाने जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमधील अॅप्पलचा सर्वर हॅक केला आहे.

नाबालिक असल्यामुळे सुरक्षा एजेंसी ने मुलाचे नाव आणि ओळख गुप्त ठेवली आहे. मीडिया रिपोर्ट वरून समजले आहे की अॅप्पल सर्वर मध्ये घुसखोरी करणार्‍या या 16 वर्षीय मास्टरमाइंडला 20 सप्टेंबरला शिक्षा सुनावण्यात येईल. ज्याला अॅप्पल मध्ये काम करायचे होते त्यानेच सर्वर हॅक का केला याची माहिती अजूनतरी समोर आली नाही. तर दुसरीकडे अॅप्पल चे हेच म्हणणे आहे की सर्वर मध्ये हॅकिंग होऊनही यूजर्सचा पर्सनल डेटा कंपनी कडे सुरक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here