Jio नं आणला 90 दिवसांचा भन्नाट प्लॅन; रोज मिळेल 2GB data, किंमत पाहून खुश व्हाल

Reliance Jio नं एक नवीन प्रीपेड प्लॅन (prepaid recharge plan) लाँच केला आहे ज्याची किंमत 749 रुपये आहे. हा रिचार्ज प्लॅन फक्त त्या लोकांसाठी बेस्ट आहे ज्यांना भरपूर इंटरनेट डेटाची गरज आहे, असं नाही तर ज्या युजर्सना वारंवार रिचार्ज करण्याचं झंझट नको, त्यांच्यासाठी देखील रिलायन्स जियोचा हा 749 रुपयांचा प्लॅन बेस्ट ऑप्शन आहे. दीर्घ वॅलिडिटी, जास्त डेटा सोबतच Jio Apps ची सुविधा देणाऱ्या या Jio Plan ची मेथीची पुढे देण्यात आली आहे.

रिलायन्स जियोचा 749 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

दीर्घ वैधता– रिलायन्स जियोचा 749 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन कंपनीनं 90 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यास जवळपास तीन महिने पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही.

डेली डेटा – Jio 749 Plan मध्ये कंपनीनं युजर्सना रोज 2 जीबी 4जी इंटरनेट डेटा दिला जात आहे. डेली 2जीबी डेटाच्या हिशोबाने संपूर्ण प्लॅनमध्ये जियो ग्राहक एकूण 180जीबी डेटाचा वापर करू शकता. लक्षात असू देत की रोज ग्राहक 2जीबी डेटाच वापरू शकतील.

अनलिमिटेड कॉलिंग – जियो कस्टमर्सना या रिचार्जनंतर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळते. हे कॉल्स संपूर्ण 90 दिवसांपर्यंत मोफत असतील ज्यांचा वापर ऑन नेटवर्क आणि ऑफ नेटवर्क दोन्ही नंबर्सवर करता येईल. या जियोच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री व्हॉइस कॉलिंग मिळते.

एसएमएस – रिलायन्स जियोच्या 749 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 90 दिवसांच्या वॅलिडिटीसाठी रोज 2जीबी डेटा सोबतच रोज 100एसएमस देखील मिळतील. हे एसएमएस देखील प्रत्येक नेटवर्कवर पूर्णपणे फ्री असतील, ज्यांचा वापर लोकल व एसटीडी कोणत्याही सर्कल मध्ये मोफत करता येईल.

jio 5g works on 4g sim

जियो अ‍ॅप्स – रिलायन्स जियो युजर्सना कंपनीकडून मिळणारा अतिरिक्त फायदा म्हणजे Jio Apps चा अ‍ॅक्सेस. कंपनीच्या नवीन 749 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील जियोकडून JioCinema, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.

रिलायन्स जियोचा 719 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जियोच्या 719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील 749 रुपयांच्या प्लॅनसारखे बेनिफिट मिळतात. हा प्लॅन देखील 2जीबी डेली डेटा देतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि जियो अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देखील मोफत मिळतो. परंतु या प्लॅनमध्ये मिळणारी वैधता कमी आहे, जियोच्या 719 रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here