50MP Camera आणि 5,000mAh बॅटरीसह OnePlus Nord CE 3 5G आला, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Highlights

  • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जीची प्रारंभिक किंमत 26,999 रुपये आहे.
  • फोनमध्ये मागे 50एमपीचा सोनी IMX890 मेन सेन्सर आहे.
  • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus नं आज भारतीय मार्केटमध्ये आपल्या Nord सीरीजचे नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. कंपनीनं OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G आणि OnePlus Buds 2R सादर केले आहेत. पुढे नॉर्ड सीई 3 ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. नॉर्ड 3 5जी च्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

OnePlus Nord CE 3 5G ची किंमत आणि उपलब्धता

  • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जीच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे.
  • डिवाइस के 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे.

वनप्लस नॉर्ड सीई 3 ऑगस्ट मध्ये ओपन सेलसाठी उपलब्ध होईल, ज्याची तारीख समजली नाही.

OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : OnePlus Nord CE 3 5G मध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे ज्यात 950 निट्स पीक ब्राइटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि सेल्फी शूटरसाठी एक पंच-होल कटआउट आहे.
  • रॅम व स्टोरेज : डिवाइसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर : OnePlus Nord 3 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782G देण्यात आला आहे.
  • ओएस : OnePlus Nord 3 5G Oxygen OS 13.1 बेस्ड Android 13 वर चालतो.
  • कॅमेरा : फोनमध्ये मागे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह 50एमपीचा सोनी IMX890 सेन्सर, 112-डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू (FoV) अल्ट्रावाइड 8 मेगापिक्सल सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. तर, फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • बॅटरी : OnePlus Nord 3 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 80W SuperVOOC चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • कलर : कंपनीनं हा फोन Grey Shimmer आणि Aqua Surge कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here