OnePlus नं अखेरीस भारतात दोन नवीन नॉर्ड स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G लाँच केला आहे. ह्या दोन्ही मोबाइल फोन्सची अनेक दिवस वाट पाहिली जात होती. नॉर्ड 3 5जी ची खासियत पाहता हा 80W SUPERVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो ज्यामुळे फोन वेगानं चार्ज होतो. हा कंपनीचा पहिला फोन आहे जो 16GB रॅमसह आला आहे. ह्या फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स पुढे देण्यात आले आहेत. Nord CE 3 5G बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
OnePlus Nord 3 5G ची किंमत
- वनप्लस नॉर्ड 3 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे.
- डिवाइसच्या 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे.
वनप्लस नॉर्ड 3 स्मार्टफोन अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याची विक्री अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये होईल जो 15 आणि 16 जुलै 2023 पासून सुरु होत आहे. ह्या सेलमध्ये फोन खरेदीवर शानदार डिस्काउंट देखील दिला जात आहे.
OnePlus Nord 3 5G चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले : OnePlus Nord 3 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 10-बिट कलर डेप्थ आणि एचडीआर10+ला सपोर्टसह 6.74-इंचाचा सुपर फ्लूड अॅमोलेड पॅनल देण्यात आला आहे.
- रॅम व स्टोरेज : डिवाइसमध्ये 16GB LPDDR5X रॅम आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमचा ऑप्शन देखील आहे.
- प्रोसेसर : OnePlus Nord 3 5G मध्ये MediaTek Dimensity 9000 SoC देण्यात आला आहे. हा 4nm प्रोसेसवर बनला आहे. चिपसेट 6GHz 5G नेटवर्कवर 7Gbps चा डाउनलोड स्पीड मिळतो. ह्यात ब्लूटूथ 5.3 सपोर्ट मिळतो.
- ओएस : OnePlus Nord 3 5G Oxygen OS 13.1 बेस्ड Android 13 वर चालतो.
- कॅमेरा : फोनमध्ये मागे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह 50एमपीचा सोनी IMX890 सेन्सर, 112-डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू (FoV) अल्ट्रावाइड 8 मेगापिक्सल Sony IMX355 सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. तर, फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
- बॅटरी : OnePlus Nord 3 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 50W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.