Moto G13 ची माहिती लीक; पंच होल कॅमेऱ्यासह येऊ शकतो बाजारात

Motorola आपल्या ‘जी’ सीरीजच्या नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे जो Moto G13 नावानं बाजारात येईल. हा मोबाइल फोन 5G आणि 4G दोन मॉडेल्समध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. तसेच यातील फक्त मोटो जी13 4जी फोन भारतीय बाजारात विकला जाऊ शकतो, असं देखील सांगण्यात आलं आहे. कंपनीनं आतापर्यंत फोन लाँच किंवा फीचर्स संबंधित कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु नव्या लीकमध्ये या मोटोरोला मोबाइलच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच याचे फोटोज देखील समोर आले आहेत.

Moto G13 डिजाईन

थेट मोटो जी13 चा लुक व डिजाईन पाहता हा स्मार्टफोन पंच-होल स्टाईल स्क्रीनसह लाँच होऊ शकतो. फोनच्या डिस्प्लेवर वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो बॉडी एजपासून थोडा दूर ठेवला जाऊ शकतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आणि बाजूला बारीक रुंद चिन पार्ट दिला जाऊ शकतोवॉल्यूम रॉकर व पावर बटन उजवीकडे असू शकतात. हे देखील वाचा: Jio ची दणकट न्यू ईयर ऑफर; 23 दिवस मोफत वापरा 5G स्पीडनं डेटा, कॉलिंग आणि एसएमएस

Moto G13 च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा डावीकडे दिला जाऊ शकतो. यात दोन मोठ्या लेन्स वर्टिकली फिट करण्यात आल्या येऊ शकतात ज्यांच्या बाजूला एलईडी लाईट आहे व सेन्सरची माहिती छापली जाऊ शकते. फोटोमध्ये 50MP लेन्स लिहलेलं स्पष्ट दिसत आहे. बॅक पॅनलवर Motorola लोगो देखील आहे परंतु यात फिंगरप्रिंट सेन्सर असेल की नाही हे समजलं नाही. फोनच्या खालच्या पॅनलवर स्पिकर ग्रिलसह यूएसबी टाईप सी पोर्ट दिला जाऊ शकतो.

Moto G13 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.5-इंच एचडी+ डिस्प्ले
  • 4जीबी रॅम ते 12जीबी रॅम
  • 50एमपी ड्युअल रियर कॅमेरा
  • 5,000एमएएच बॅटरी

मोटोरोला मोटो जी13 संबंधित लीक्स व सर्टिफिकेशन्सनुसार, हा मोबाइल फोन 6.5-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या मोबाइल फोनमध्ये एलसीडी पॅनलवर बनलेली स्क्रीन मिळू शकते जी वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर असू शकतो. परंतु मोटो जी13 5जी फोनमध्ये चिपसेट कोणता असेल हे समजलं नाही.

Moto G13 4G फोन 4 GB RAM + 64 GB storage तथा 4 GB RAM + 128 GB storage सह लाँच केला जाऊ शकतो. तसेच Moto G13 5G फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन 12 जीबी पर्यंतच्या रॅमसह लाँच होऊ शकतो आणि 512 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. हा फोनचा सर्वात मोठा व्हेरिएंट असू शकतो. हे देखील वाचा: स्वस्त Tata Nano Electric कारसाठी सज्ज व्हा; लाँच होण्याआधीच फोटोज आले समोर

Moto G13 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स मिळू शकते. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी मोटो जी13 5जी फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here