स्वस्त Electric कार लाँच करण्याची टाटांची योजना; आर्टिस्टनं दाखवला टाटा नॅनोचा कॉन्सेप्ट

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. हे पाहून नवीन व जुन्या ऑटोमोबाइल कंपन्या आता हळूहळू आपल्या पोर्टफोलियोमध्ये इलेक्ट्रिक कार्सचा समावेश करत आहेत. या लिस्टमध्ये टाटा मोटर्सचं नाव सर्वातवर आहे. कंपनीच्या ताफ्यात सध्या 4 इलेक्ट्रिक मॉडेल्स आहेत आणि लवकरच TATA Punch EV देखील बाजारात येणार असल्याची माहिती स्वतः कंपनीनं कन्फर्म केली होती. आता आपल्या इलेक्ट्रिक पोर्टफोलियोमध्ये एका एंट्री लेव्हल मॉडेलचा समावेश कंपनी करू शकते.

भारतातील लोकप्रिय ऑटोमोबाइल कंपनी TATA Motors आपल्या ई-कारची यादी वाढवत एक स्वस्त ईव्ही सादर करण्याची योजना बनवत आहे. लीक रिपोर्ट्सनुसार लवकरच टाटा नॅनो इलेक्ट्रिक अवतारात दिसू शकते. या रिपोर्टनंतर आता Tata Nano EV चे डिजिटल स्वरूपात तयार करण्यात आलेले फोटोज ऑनलाइन शेयर करण्यात आले आहेत. हे देखील वाचा: लाँच पूर्वीच लीक झाले OnePlus 11 चे फोटो; पुढील आठवड्यात येतोय शक्तिशाली अँड्रॉइड फोन

Tata Nano Ev Design

ही डिजाइन ऑटोमोटिव डिजाइन आर्टिस्ट प्रत्यूष राउत यांनी तयार केली आहे. फोटोज तुम्ही वर पाहू शकता. हे फोटोज पाहून वाटत आहे की इलेक्ट्रिक नॅनो लुक व साइजच्या बाबतीत खूप अ‍ॅडव्हान्स असेल. तसेच डिजाइन पाहता यात पापणीच्या आकाराचा DRL, कॉम्पॅक्ट हेडलॅम्प्स आणि मोठा मिरर पॅनल दिसत आहे. तसेच, बंपर सेक्शनमध्ये स्माइली इफेक्ट देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर साइड पॅनल्सचा लुक आणि फील देखल खूप अट्रॅक्टिव आहे. त्याचबरोबर फ्रंट डोरमध्ये फ्लश हँडल आहेत आणि रियर डोरमध्ये हँडल सी-पिलरवर ठेवण्यात आले आहेत. यात मोठा व्हीलबेस आहे, त्यामुळे हिची इंटीरियर स्पेस वाढेल.

मीडिया रिपोर्टनुसार स्वदेशी वाहन निर्माता कंपनी Tata Nano (टाटा नॅनो) इलेक्ट्रिक पावरट्रेनसह पुन्हा सादर करू शकते. तसेच Tata Nano EV (टाटा नॅनो ईवी) चे मेकॅनिकल डिटेल्स, सस्पेंशन सेटअप आणि टायर्समध्ये महत्वाचा बदल दिसू शकतो. तसेच रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की टाटा नॅनो ईव्हीची योजना प्रोडक्शन पर्यंत पोहोचली आहे. परंतु टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार संबंधित कंपनीनं सध्या कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. हे देखील वाचा: शून्य रुपयांमध्ये घरी आणा नोकियाचा 5G Phone; Nokia G60 वर एक नव्हे दोन वर्षांची वॉरंटी फ्री!

बाजारात आधीपासून Tata Nano EV उपलब्ध!

विशेष म्हणजे Tata Nano EV कस्टम वन-ऑफ प्रोजेक्ट स्वरूपात आधीपासून उपलब्ध आहे. टाटा नॅनो ईव्हीचा सिंगल कस्टम यूनिट इलेक्ट्रा ईव्हीद्वारे रतन टाटा यांना भेट करण्यात आली आहे. रतन टाटा ईव्ही स्टार्टअप इलेक्ट्रा ईव्हीच्या प्रारंभिक संस्थपाक आणि गुंतवणूकदार आहेत. कस्टम नॅनो EV 72V EV आर्किटेक्चरवर आधारित आहे आणि यात कस्टम रेड इंटीरियर्स आहेत. तसेच, टाटा नॅनो ईव्हीमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर बंगळुरूच्या रस्त्यांवर ही कार चालत आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here