Jio ची दणकट न्यू ईयर ऑफर; 23 दिवस मोफत वापरा 5G स्पीडनं डेटा, कॉलिंग आणि एसएमएस

नवीन वर्षानिमित्त रिलायन्स जियोनं आपल्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर सादर केल्या आहेत. न्यू ईयर ऑफर अंतगर्त कंपनीनं 2023 रुपयांचा नवीन प्लॅन सादर केला आहे. तसेच, 2,999 रुपयांच्या रिचार्जसह एक्स्ट्रा डेटा आणि वैधता देण्याची घोषणा केली आहे. खास बाब म्हणजे या दोन्ही प्लॅनसह कंपनी युजर्सना 5G डेटाची सुविधा देत आहे. चला जाणून घेऊया जियोच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणते अतिरिक्त फायदे मिळत आहेत.

जियोचा 2999 रुपयांचा प्लॅन

जियोच्या दीर्घ वैधता असलेल्या या प्लॅनसह कंपनी रोज 2.5 जीबी डेटा ऑफर करत आहे. तसेच, रिचार्जची वॅलिडिटी 365 दिवस आहे. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यास तुमचं वर्षभराचं टेंशन संपून जाईल. तसेच न्यू ईयर ऑफर अंतगर्त ग्राहकांना या रिचार्जसह आता 23 दिवसांची अतिरिक्त वैधता व 75जीबी डेटा दिला जात आहे.

या ऑफरनंतर प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 388 दिवसांची वैधता मिळते. तसेच रिचार्जमध्ये एकूण 912.5जीबी डेली डेटा सह 75जीबी आणखी डेटा मिळेल म्हणजे एकूण 987.5जीबी डेटाचा वापर जियोच्या 2,999 रुपयांच्या फिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल. हे देखील वाचा: स्वस्त Tata Nano Electric कारसाठी सज्ज व्हा; लाँच होण्याआधीच फोटोज आले समोर

तसेच जियोच्या 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळतात. तसेच या प्लॅनसह देखील कंपनी हाय-स्पीड इंटरनेटसाठी 5G डेटा ऑफर करत आहे. त्याचबरोबर प्लॅनमध्ये JioTV, JioCinema JioSecurity, JioCloud अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन दिलं जात आहे.

Jio 2023 Plan Details

जियोच्या या 2023 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2.5 जीबी डेटा मिळणार आहे. त्या हिशोबाने एकूण वैधतेसाठी कंपनी युजर्सना एकूण 630 जीबी डेटा वापरण्यासाठी देत आहे. तसेच या प्लनंदाचे युजर्सना कोणत्याही अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा मिळत आहे. यामुळे ग्राहक ऑन आणि ऑफ नेटवर्क अमर्याद कॉलिंग करू शकतात. तसेच लोकल आणि एसटीडी नंबर्सवर एसएमएस पाठवण्यासाठी डेली 100 एसएमएस मोफत मिळतील. हे देखील वाचा: लाँच पूर्वीच लीक झाले OnePlus 11 चे फोटो; पुढील आठवड्यात येतोय शक्तिशाली अँड्रॉइड फोन

जियोच्या या 2023 रुपयांच्या नव्या प्लॅनची वैधता 252 दिवस आहे म्हणजे हा एक लॉन्ग टर्म रिचार्ज प्लॅन आहे – रिलायन्स जियो युजर्सना कंपनीकडून मिळणारा अतिरिक्त फायदा म्हणजे Jio Apps चा अ‍ॅक्सेस. कंपनीच्या नवीन 2023 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील जियोकडून JioCinema, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.

कधी पर्यंत असेल Jio New Year Offer?

तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की ही ऑफर कधीपर्यंत उपलब्ध असेल. जर तुम्हालाही या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरच रिचार्ज करा कारण कंपनी पुढील वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ही ऑफर बंद करू शकते. परंतु ही काही अधिकृत माहिती नाही कारण कंपनीनं या ऑफरच्या लास्ट डेटबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here