ताशी 200 चा टॉप स्पीड आणि 300km रेंजसह आली ही इलेक्ट्रिक बाइक, सर्वच फीचर्स थक्क करणारे

फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच यासाठी ईव्ही निर्माते देखील काही तरी नवीन आणि हटके करण्याचे प्रयत्न करत आहेत. आता ऑस्ट्रियन बाइक निर्माता Horwin Global नं EICMA 2022 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक मॅक्सी-स्कूटर सादर केली आहे. ब्रँडनुसार ही एक इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे जी दमदार फीचर्स सोबतच मोठ्या रेंज आणि फास्ट स्पीडसह मार्केटमध्ये लवकरच सादर केली जाईल. अजूनतरी या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लाँच डेट आणि किंमतीची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.

200kmph चा टॉप स्पीड आणि 300km रेंज

कंपनीचा दावा आहे की या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टॉप स्पीड 200kmph असेल. Senmenti 0 फक्त 2.8 सेकंदात 0-100 किमी ताशी वेग गाठू शकते. तसेच या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 200 किमी इतका असेल. ही 2023 डुकाटी डायवेल V4 इतकी वेगवान असेल. म्हणून कंपनी हिला स्कूटर ऐवजी ‘ई-मोटरसायकल’ म्हणत आहे. हे देखील वाचा: डीटेल्ड फोटो काढण्यासाठी 108MP कॅमेरा; वेगवान प्रोसेसरसह Realme 10 Pro Plus 5G लाँच

हॉर्विननं दावा केला आहे की सेनमेंटी 0 एकदा चार्ज केल्यावर 300 किलोमीटर अंतर पार करू शकते, जेव्हा हिचा सरासरी स्पीड 88 किमी असेल. तसेच यात तीन राइडिंग मोड आणि लीन-सेन्सेटिव्ह एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल असे फीचर असतील. या स्कूटरमधील टायर प्रेशर डिस्प्लेवर दिसेल. कंपनी यात कीलेस इग्निशन, हिल-क्लाइम्ब आणि रिवर्स असिस्ट, एक ब्लूटूथ-सपोर्टेड टीएफटी डिस्प्ले आणि बोर्डवर एक सपोर्टेड कॅमेरा असेल जो प्रवासात फोटो कॅप्चर करेल, असे फिचर देणार आहे.

स्पेसिफिकेशन्स

Senmenti 0 मध्ये 15-इंचाचे टायर्स असतील यातील 120-सेक्शन टायर पुढे आणि मागे 160-सेक्शन यूनिट असेल, दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक सिस्टम देण्यात आली आहे. आशा आहे की हॉर्विन पुढील वर्षी 2023 च्या पहिल्या सहामहिन्यात युरोपमध्ये ही ई-स्कूटर विकण्यास सुरु करेल. हे देखील वाचा: स्मूद डिस्प्लेसह Realme 10 Pro लाँच! कमी किंमतीत मिळतील रेडमीपेक्षा दमदार स्पेसिफिकेशन्स

वर सांगितलेले फीचर्ससह ही ई-स्कूटर आल्यास नक्कीच ईव्ही सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालेल. हॉर्विननं EICMA मध्ये SENMENTI X नावाची एक कॉन्सेप्ट ई-बाइक देखील दाखवली आहे. जिच्यात एक वेगळं सेल्फ-बॅलेन्सिंग फंक्शन आहे जे ड्राईव्हिंगच्या वेळी बाइकला आपोआप स्थिर करत आणि त्यामुळे रायडींग सुरक्षित होते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here