Chienese Smartphones नको? पाहा नॉन चिनी मोबाइलची यादी

भारतात विविध विचारांचे लोक राहतात परंतु जेव्हा प्रश्न देशाचा येतो तेव्हा सर्व भारतीय एकत्र येतात. काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटपट झाली त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देश एकवटला आहे. भारतीय मोबाइल युजर्सना चीनमध्ये बनलेले प्रोडक्ट्स नको आहेत आणि Chinese phone, Chinese television तसेच अन्य चिनी गॅजेट्स बॅन करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहेत. जर तुम्ही देखील Made in China Smartphone वापरू इच्छित नसाल तर पुढे आम्ही भारतीय बाजारातील non-Chinese Flagship Phones ची यादी दिली आहे जे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात. हे त्या त्या कंपन्यांचे बेस्ट स्मार्टफोन आहेत.

नॉन चायनीज फोन

  • Samsung Galaxy S22 Ultra
  • Apple iPhone 14 Pro Max
  • Google Pixel 6
  • ROG Phone 6 Pro
  • Nokia XR 20 5G

Samsung Galaxy S22 Ultra

तुम्ही Samsung चा फ्लॅगशिप फोन Galaxy S22 Ultra विकत घेऊ शकता. या फोनच्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 109,999 रुपये आहे. फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, यात 6.8 इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1440 x 3088 पिक्सल, रिफ्रेश रेट 120Hz आणि 19.5:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर Qualcomm SM8450 Snapdragon 8 Gen 1 (4 nm) प्रोसेसर आहे. हा फोन 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. कॅमेरा पाहता फोनमध्ये 108 मेगापिक्सल + 10 मेगापिक्सल + 10 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सलचा सेटअप देण्यात आला आहे. तसेच 40MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो आणि पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी आहे. हे देखील वाचा: शाओमीनंतर आता Samsung ची बारी! आयफोनला लाजवणाऱ्या कॅमेऱ्यासह येऊ शकतो Galaxy S23 Ultra

Apple iPhone 14 Pro Max

iPhone 14 Pro Max चा 128GB स्टोरेज मॉडेल 1,39,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याची खासियत पाहता iPhone Pro Max मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात लेटेस्ट A16 Bionic प्रोसेसर मिळतो जो 4-नॅनोमीटर आर्कटेक्चरवर बनला आहे. तसेच फोनच्या मागे 48MP ट्रिपल कॅमेरा आणि फ्रंटला 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

Google Pixel 7 Pro

Google Pixel 7 Pro चा 12GB + 128GB मॉडेल 84,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Google Pixel 7 Pro मध्ये 6.7 इंचाचा LTPO QHD + डिस्प्ले, Tensor G2 चिपसेट, 12GB रॅम आणि 128GB / 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी डिवाइसमध्ये 5x ऑप्टिकल झूमसह 48MP टेलीफोटो लेन्स आणि LDAF, 50MP चा प्रायमरी वाइड-अँगल शूटर आणि 12MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स मिळते. तर सेल्फीसाठी 11MP चा सेल्फी स्नॅपर देण्यात आला आहे. त्याचबरोबर पावर बॅकअपसाठी 5000एमएएचची बॅटरी मिळते.

ROG Phone 6 Pro

ASUS ROG Phone 6 Pro स्मार्टफोन 89,999 रुपयांमध्ये घरी घेऊन येत येईल. फोनमध्ये 6.78-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले, Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि 6000 mAh ची बॅटरी मिळते. तसेच फोनमध्ये 50MP Sony IMX766 आहे, जोडीला 13MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 5MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये सेल्फीसाठी 12MP Sony IMX663 कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: 425km रेंज येतेय MG 4 EV; Auto Expo 2023 मधून दिसेल पहिली झलक

Nokia XR20 5G

Nokia XR20 5G ची किंमत 44,000 रुपये आहे. Nokia XR20 एक मजबूत फोन आहे जो 6.67 इंचाच्या फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. तसेच हँडसेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट मिळतो. त्याचबरोबर डिवाइसमध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलची फिक्स्ड-फोकस लेन्स मिळते तसेच हँडसेट मध्ये 4630mAh ची बॅटरी देम्यात आली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here