OnePlus 10 Pro वर मिळतोय बँक डिस्काउंट; फोनमध्ये 12GB रॅमसह 256GB स्टोरेज

चिनी कंपनी वनप्लसनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 चीनमध्ये सादर केला आहे. हा आजवरचा सर्वात शक्तिशाली वनप्लस असून लवकरच याची भारतीय बाजारात देखील एंट्री होऊ शकते. वनप्लस 11 सीरीज लाँच होण्याआधीच कंपनीनं वनप्लस 10 सीरिजच्या हँडसेटच्या किंमतीत कपात केली होती. तर आता OnePlus 10 Pro वर 6000 रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. पुढे आम्ही OnePlus 10 Pro 5G वरील ऑफर्सची माहिती दिली आहे.

OnePlus 10 Pro ऑफर

लाँचच्या वेळी OnePlus 10 Pro 5G च्या बेस मॉडेलची किंमत 66,999 रुपये ठेवण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या प्राइस कटनंतर हा मॉडेल आता 61,999 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर विकला जात आहे, ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते. परंतु आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 6000 रुपयांची सूट दिली जात आहे. सध्या OnePlus 10 Pro 8GB + 128GB मॉडेल 61,999 रुपयांमध्ये तर 12GB + 256GB व्हेरिएंट 66,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. वनप्लस 10 प्रो Volcanic Black आणि Emerald Forest कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: फक्त 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणार इलेक्ट्रिक कार; 631km रेंजसह Hyundai Ioniq 5 ची एंट्री

OnePlus 10 Pro चे पावरफुल स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन 6.7 इंचाच्या 2के फ्ल्यूड अ‍ॅमोलेड एलटीपीओ 2.0 पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करती आहे. हा फोन इन -डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो ज्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. फोन स्क्रीन एचडीआर10+ आणि एमईएमसी सारख्या फीचर्ससह येते.

OnePlus 10 Pro अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 12 जीबीसह भारतात सेलसाठी उपलब्ध आहे ज्यात 128 जीबी तसेच 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा वनप्लस फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.

फोटोग्राफीसाठी OnePlus 10 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. विशेष म्हणजे हा वनप्लस मोबाइल 2nd Gen hasselblad lens सह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वनप्लस 10 प्रो स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: ओप्पो-विवो नव्हे तर शाओमीचा सेल्फी एक्सपर्ट होणार लाँच; Xiaomi 13 Lite वेबसाइटवर लिस्ट

OnePlus 10 Pro पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. वेगानं चार्ज करण्यासाठी यात 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच वनप्लस 10 प्रो स्मार्टफोनमध्ये 50W AirVOOC wireless charging आणि रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here