जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लक्षात घेतले पाहिजे कि कि सरकारने 15 फेब्रुवारीपासून देशातील सर्व नॅशनल हायवेजवर बनलेल्या टोल प्लाजामध्ये सर्व लेन्सना ‘फीस प्लाजा म्हणजे फास्टॅग लेन’ घोषित केले आहे. याचा अर्थ असा आहे कि सर्व गाडयांना FASTag अनिवार्य झाले आहे. जर तुमच्या कार मध्ये फास्टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट रक्कम द्यावी लागेल. फास्टॅगबद्दल अनेक लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत जसे कि हा कुठून विकत घ्यावा, फास्टॅग हरवला तर काय, फास्टॅग मध्ये पैसे कसे ऍड करावे इत्यादी. आज आम्ही तुम्हाला फास्टॅग संबंधित अश्याच प्रश्नाची उत्तरे 10 पॉईंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. (fastag online india how to buy online recharge car toll plaza)
FASTag कुठून विकत घ्यावा
फास्टॅगसाठी NHAI ने संपूर्ण देशात 40,000 पेक्षा जास्त सेंटर उभारले आहेत, जिथून तुम्ही सहज हा विकत घेऊ शकता. तसेच पेटीएम, एयरेटल पेमेंट बॅंक आणि बँकेच्या ऍप्समधून पण हा विकत घेता येईल. FASTag ची किंमत 100 रुपये आहे आणि 200 रुपयांचे सिक्योरिटी डिपॉजिट पण द्यावे लागेल.
कोणत्या डाक्युमेंटची गरज पडेल
जर टोल बूथवरून फास्टॅग घेतला तर तुम्हाला ड्राइविंग लाइसेंस आणि गाडीच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) ची कॉपी जमा करावी लागेल. तसेच पेटीएम किंवा कोणत्याही बँकेच्या ऍपमधून FASTag खरेदीसाठी आधार कार्ड आणि कारची माहिती टाकावी लागेल.
हे देखील वाचा : रियलमीचा पावरफुल फोन Realme GT 5G स्मार्टफोन 4 मार्चला होईल लॉन्च, कंपनीने केला खुलासा
FASTag ची वैधता
फास्टॅगची वैधता 5 वर्षांची आहे. जर तुम्हाला तुमच्या वापरानुसार टॅग फक्त रिचार्ज / टॉपअप करावा लागतो.
फास्टॅग रिचार्ज कसा करावा
जर तुम्ही तुमच्या FASTag ला बॅंक खात्याशी जोडले नाही तर तुम्ही हा रिजार्च पण करू शकता. हा तुम्ही यूपीआई, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने रिचार्ज करू शकता. तसेच गुगल पे आणि इतर ऑनलाइन पेमेंट सर्विसद्वारे हा रिचार्ज केला जाऊ शकतो. पण, एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल कि जर तुम्ही पेटीएम वॉलेट मध्ये फास्टॅगसाठी पैसे ऍड करत असाल तर तुम्हाला टोल प्लाजावर पोहोचण्याआधी 1 तासआधी वॉलेट मध्ये पैसे ऍड करावे लागतील.
चुकून फास्टॅग मधून पैसे कट झाल्यास काय करावे
जर तुमच्या फास्टॅगमधून टोल शुल्क चुकून कट झाले तर तुम्हाला फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेच्या ग्राहक सेवा डेस्ककडे याची तक्रार करावी लागेल. तुमची तक्रार बघून चार्जबॅक होईल.
हे देखील वाचा : 24 फेब्रुवारीला होईल Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A ची भारतात एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या या फोन्सबाबत सर्वकाही
एका FASTag चा वापर दुसऱ्या गाडीत करू शकतो
जर तुमच्या एका कारसाठी FASTag विकत घेतला तर तो फक्त त्या कारमध्ये चालेल, जिचे KYC डॉक्यूमेंट्स जमा केले असतील. त्यामुळे तुम्हाला ताकीद दिली जात आहे कि असे बिलकुल करू नका.
FASTag खराब झाल्यावर काय करावे
जर FASTag फाटला, खराब झाला तर तुम्हाला फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेशी संपर्क करावा लागेल आणि त्यांच्याकडून हा बदलून नवीन फास्टॅग देण्यासाठी अप्लाई करावे लागेल.
अश्याप्रकारे चेक करा बॅलेंस
टोल प्लाजामध्ये जाण्याआधी फास्टॅग वापरकर्ता मोबाईल ऍप My FASTag App मध्ये बॅलेंस स्थितीची माहिती घेता येईल.
हे देखील वाचा : लो बजेट मध्ये Motorola चा नवीन डाव, फक्त 7,499 रुपयांमध्ये लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी असलेला Moto E7 Power
एक्सप्रेसवेवर पण येईल काम
खासकरून एक्सप्रेसवेवर कंट्रोल ऍक्सिस असतो आणि त्यावर टोलचे दर पण वेगळे असतात. यमुना एक्सप्रेसवेवर खाजगी आणि कमर्शियल व्हीकलचा टोल FASTag द्वारे केला जात आहे तर 2-व्हीलर्ससाठी कॅश लेन बनले आहे.
कोणत्या गाड्यांसाठी आहे आवश्यक
देशभरात सर्व खाजगी आणि कमर्शियल गाड्यांसाठी FASTag अनिवार्य करण्यात आला आहे. फक्त दुचाकी वाहनांसाठी सूट आहे.

















