6.56 इंचाच्या डिस्प्लेसह OPPO A17 मलेशियात लाँच

OPPO A17 India Launch: 91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव्हली OPPO च्या बजेट सेगमेंट स्मार्टफोन रेंज मध्ये येणाऱ्या OPPO A17 च्या किंमतीची माहिती दिली होती. आता पुन्हा एकदा आमची बातमी खरी ठरली असून कंपनीनं OPPO A17 Mobile Phone भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन भारतात येण्याआधी Malaysia मध्ये लाँच करण्यात आला होता. चला जाणून घेऊया ओप्पो ए17 स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची संपूर्ण माहिती.

OPPO A17 Specifications

स्पेसिफिकेशन्स पाहता ओप्पो ए17 स्मार्टफोन ग्लोबल मॉडेल सारखाच आहे. फोनमध्ये 6.56 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचे रिजोल्यूशन एचडी+ डिस्प्ले आहे. या हँडसेटमध्ये हाय रिफ्रेश रेट मिळत नाही तर कंपनीनं यात स्टँडर्ड 60हर्ट्ज रिफ्रेश रेटचा वापर केला आहे. ही एक वॉटर ड्रॉप नॉच असलेली स्क्रीन आहे.

50mp camera 5000mah battery phone oppo a17 launched india price sale specification

प्रोसेसिंगसाठी 12nm प्रोसेसवर बनलेल्या ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेटचा वापर ओप्पोनं केला आहे. तर जोडीला ग्राफिक्ससाठी आयएमजी जीई8320 जीपीयू मिळतो. OPPO A17 मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. हे देखील वाचा: चार्जिंग दरम्यान Electric Scooter चा स्फोट, 7 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू!

फोटोग्राफीसाठी OPPO A17 च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. यात एफ/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, सोबतीला कंपनीनं सेकंडरी डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा ओप्पो मोबाइल एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A17 अँड्रॉइड 12 आधारित कलर ओएस 12.1.1 वर चालतो. पावर बॅकअपसाठी ओप्पो ए17 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पाण्याच्या शिंतोड्यांपासून स्मार्टफोन सुरक्षित राहावा म्हणून आयपीएक्स4 रेटिंग देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 4G, वायफाय, ब्लूटूथ 5.3 आणि जीपीएस सारखे ऑप्शन आहेत. हे देखील वाचा: T20 World Cup: प्रत्येक क्रिकेट मॅचची मजा मिळवा तुमच्या फोनवर, या 5 अ‍ॅप्सवर बघा लाइव्ह

50mp camera 5000mah battery phone oppo a17 launched india price sale specification

OPPO A17 Price

OPPO A17 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट कंपनीनं भारतात लाँच केला आहे. या एकमेव मॉडेलमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ओप्पो ए17 ची इंडियन प्राइस पाहता हा फोन कंपनीनं 12,499 रुपयांमध्ये सादर केला आहे. या प्राइस रेंजमध्ये भारतीय बाजारात आधीपासून असलेल्या Vivo Y16 कडून ओप्पोचा तगडे आव्हान मिळू शकते. OPPO A17 स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि सनलाइट ऑरेंज कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.

OPPO A17 – 4GB RAM + 64GB Storage = 12,499 रुपये

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here