OTT वर दर आठवड्याला नवनवीन शो व वेब सीरीज दर्शकांचं मनोरंजन करण्यासाठी रिलीज होतात. त्यात आता अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर अजून एका सुपरहिट सीरीजच्या नवीन सीजनची भर पडणार आहे. जिच्या घोषणेसोबतच रिलीज डेट आणि टीजर जारी करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात टीव्हीएफ द्वारा निर्मित ‘हॉस्टल डेज’ चा तिसरा सीजन (Hostel Daze Season 3) रिलीज होणार आहे. या नवीन सीजनमध्ये कॉलेज लाइफ आणि मस्तीसह यंदा सप्टेंबरमध्ये ज्यांनी जगाचा निरोप घेतला ते कॉमेडियन Raju Srivastava देखील दिसतील. ही त्यांची शेवटची सीरीज असेल, जिच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांना हसवतील. चला जाणून घेऊया Hostel Daze Season 3 Release Date, Teaser आणि Cast सोबतच सर्वकाही.
या दिवशी रिलीज होईल Hostel Daze Season 3
प्राइम व्हिडीओवर Hostel Daze Season 3 पुढील आठवड्यात 16 नोव्हेंबरला रिलीज केली जाईल. जर तुम्ही अजूनपर्यंत या Web Series चे मागील दोन सीजन पहिले नसतील तर तुम्ही आता Prime Video वर सीरीजचे दोन्ही सीजन स्ट्रीम करू शकता. हे देखील वाचा: Kantara सारखे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ‘हे’ आहेत 5 दाक्षिणात्य चित्रपट; OTT प्लॅटफॉर्म्सवर करता येतील स्ट्रीम
https://www.instagram.com/p/CkplYg5yfLc/?utm_source=ig_web_copy_link
पाहा Hostel Daze Season 3 Teaser
टीजरनुसार हॉस्टल डेजच्या तिसऱ्या सीजनमध्ये इंजिनिअरिंगचे विद्यार्थी तीन वर्ष कशी घालवतात आणि कशाप्रकारे मस्ती करतात, हे दाखवण्यात आलं आहे. यावेळी देखील नवीन सीजनमध्ये सीनियर्स जूनियर्समध्ये मस्करी सुरु आहे. टीजरमध्ये विद्यार्थ्यांच्या मस्तीसह त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या देखील दाखवण्यात आल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CksJ3szglQj/?utm_source=ig_web_copy_link
Raju Srivastava यांची शेवटची सीरीज
दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं यंदा 21 सप्टेंबरला निधन झालं होतं. राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांची ही शेवटची सीरीज असेल. ‘हॉस्टल डेज’ च्या तिसऱ्या सीजनमध्ये राजू श्रीवास्तव यांचं पात्र कोणतं आहे आणि ते किती मोठं आहे याचा खुलासा झाला नाही. परंतु टीजरमध्ये त्यांना पाहून त्यांचा रोल खूप शानदार आणि मोठा असेल, असं वाटतं आहे. दुसरीकडे त्यांच्या फॅन्सचे डोळे टीजर पाहून पाणावले आहेत. हे देखील वाचा: 599 रुपयांमध्ये वर्षभर चालणारा Amazon Prime Video Plan; Netflix आणि Disney+ Hotstar च्या अडचणी वाढल्या
Hostel Daze Season 3 Star Cast
अभिनव आनंद द्वारा दिग्दर्शित वेब सीरीज हॉस्टल डेज सीजन 3 मध्ये ओटीटीचे लोकप्रिय चेहरे असतील. या सीरीजमध्ये LT. Raju Srivastava, Ahsaas Channa (Akansha), Luv Vispute (Chirag Bansal), Shubham Gaur (Rupesh “Jaat” Bhaati), Nikhil Vijay (Jatin), Ayushi Gupta ( Nabomita Bharadwaj) आणि Utkarsh Sarkar असतील. तसेच, सीरीजमध्ये यावेळी नवीन चेहरे देखील दिसतील.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.















