5 इंचाच्या डिस्प्लेसह Itel A24 Pro बांग्लादेशात लाँच; पाहा संपूर्ण माहिती

Highlights

  • Itel A24 Pro एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे जो 4 हजारांच्या रेंज मध्ये लाँच झाला आहे.
  • हा स्मार्टफोन Android ‘Go’ edition वर चालतो.
  • या स्वस्त फोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटीसह 2MP Camera आणि 32GB Storage मिळते.

लो बजेट स्मार्टफोन आणि स्वस्त मोबाइल फोन्स बनवणाऱ्या टेक ब्रँड आयटेलनं एक नवीन entry-level smartphone बाजारात आणला आहे. कंपनीनं Itel A24 Pro बांग्लादेशात लाँच केला आहे. हा ब्रँडच्या अन्य मोबाइल्सप्रमाणे बेसिक स्पेसिफिकेशन्ससह आला आहे ज्यात 5 इंचाचा डिस्प्ले, 2 मेगापिक्सल कॅमेरा, अँड्रॉइड गो एडिशन, 32जीबी इंटरनल स्टोरेज आणि 3,020एमएएच बॅटरी मिळते. फोनची खासियत म्हणजे या 4जी स्मार्टफोनची किंमत 4 हजारांच्या रेंजमध्ये ठेवण्यात आली आहे.

Itel A24 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • 5″ IPS LCD display
  • 2MP Rear Camera
  • 1.4GHz Unisoc SC9832E SoC
  • 3,020mAh battery

आयटेल ए24 प्रो स्मार्टफोन 850 x 480 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 5 इंचाच्या डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे वरच्या आणि खालच्या बाजूला रुंद बेजल्स आहेत. वरच्या बाजूला स्पिकर, कॅमेरा आणि सेन्सर देण्यात आले आहेत, तर खालच्या बाजूला टच नेव्हिगेशन की आहेत. हा फोन पॉलीकार्बोनेट डिजाइनवर बनला आहे ज्याचे डायमेंशन 145.4 x 73.9 x 9.85एमएम आहे. हे देखील वाचा: असा दिसेल आगामी OPPO Reno8 T 5G; ऑफिशियल टीजरमधून समोर आला हटके लूक

Itel A24 Pro अँड्रॉइड 12 (गो एडिशन) वर लाँच झाला आहे जो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉड-कोर Unisoc SC9832E प्रोसेसरवर चालतो. हा स्मार्टफोन स्मार्टफोन 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो. यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून एक्स्ट्रा 32जीबी पर्यंत वाढवता येते. म्हणजे कार्डच्या माध्यमातून एकूण स्टोेरेज 64जीबी मिळवता येईल. हे देखील वाचा: जियोनं बंद केलं परंतु आता Airtel 3 नवीन प्लॅन्समध्ये देतेय Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन; पाहा यादी

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 2 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट पॅनलवर 0.3 मेगापिक्सलची लेन्स आहे. सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पवार बॅकअपसाठी यात 3,020एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत BDT 5,990 आहे जी भारतीय करंसीनुसार 4,600 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here