स्वस्त Infinix Hot 30i स्मार्टफोन मार्चमध्ये येणार भारतात; Infinix Y1 Plus Neo लॅपटॉपसह होणार एंट्री

Highlights

  • इनफिनिक्स कंपनी नवीन स्मार्टफोन आणि लॅपटॉप भारतात लाँच करणार आहे.
  • फोनचं नाव Infinix Hot 30i आणि लॅपटॉप Infinix Y1 Plus Neo असेल.
  • हॉट 30आय बजेट फ्रेंडली मोबाइल असेल तसेच वाय1+ नियो लॅपटॉप देखील कमी किंमतीत येईल.

इनफिनिक्स इंडियानं आज माहिती दिली आहे की कंपनी भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Infinix Hot 30i सादर करणार आहे. हा एक बजेट फ्रेंडली मोबाइल फोन असेल जो या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये भारतात लाँच होईल. फक्त इतकेच नव्हे तर इनफिनिक्स हॉट 30आय सोबतच कंपनी आपला नवीन लॅपटॉप Infinix Y1 Plus Neo देखील भारतीय बाजारात सादर करू शकते.

इनफिनिक्सने प्रेस रिलीजच्या माध्यमातून आपल्या नवीन प्रोडक्ट लाँचची माहिती दिली आहे. कंपनीनं स्पष्ट केलं आहे की ते भारतीय बाजारात स्वस्त Infinix Hot 30i स्मार्टफोन तसेच Infinix Y1 Plus Neo लॅपटॉप आणत आहेत. हे दोन्ही डिवायस याच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये भारतात लाँच केले जातील. या दोघांची लाँच डेट मात्र कंपनीनं सांगितली नाही. हे देखील वाचा: Redmi 12C येतोय भारतात; लाँचपूर्वीच सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला फोन

Infinix Hot 30i

इनफिनिक्स हॉट 30आय बद्दल बोलायचं झालं तर कंपनीनं या फोनचे फोटो शेयर केले आहेत, ज्यात रियर पॅनलच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर डायमंड कट डिजाईन देण्यात आली आहे जी मोठ्याप्रमाणात Realme च्या जुन्या नंबर सीरीज स्मार्टफोन्स सारखी आहे. Infinix Hot 30i मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला डावीकडे आहे. आशा आहे की यात एक 50 मेगापिक्सलचा सेन्सर असेल.

Infinix Hot 30i बद्दल कंपनीनं म्हटलं आहे की या फोनमध्ये डायनॉमिक डिजाईन सोबतच जास्त मेमरी आणि मोठा डिस्प्ले दिली जाईल. हा फोन ग्लास आणि लेदर दोन्ही फिनिशसह बाजारात उपलब्ध होईल. कंपनीनं इशारा दिला आहे की इनफिनिक्स हॉट 30आय एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असेल जो कमी किंमतीत लाँच केला जाईल. हे देखील वाचा: OnePlus Ace 2V मध्ये मिळणार 5000mAh ची बॅटरी आणि आयआर ब्लास्टर; कंपनीनं दिली माहिती

Infinix Y1 Plus Neo

इनफिनिक्सच्या लॅपटॉप वाय1 प्लस नियो पाहता हा एक हलका पोर्टेबल लॅपटॉप असेल ज्यात अनेक शानदार फीचर्स मिळतील. कंपनीनं मात्र आपल्या नवीन लॅपटॉप संबंधित जास्त माहिती दिली नाही परंतु इतकं सांगितलं आहे की याची किंमत आक्रमक असेल. फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व लाँच डेटसाठी आता कंपनीच्या नवीन घोषणेची वाट पाहावी लागेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here