रियलमी जीटी नियो 5 एसईची लाँच डेट समजली, AnTuTu लिस्टिंगमधून स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Highlights

  • 3 एप्रिलला चीनमध्ये Realme GT Neo 5 SE को लाँच केला जाईल.
  • कंपनीनं लाँच डेट सोबतच डिवाइसच्या लुकचा खुलासा केला आहे.
  • फोनच्या महत्वाचे स्पेसिफिकेशन्स AnTuTu लिस्टिंगमध्ये समोर आले आहेत.

रियलमीनं अखेरीस आपल्या आगामी फोन Realme GT Neo 5 SE स्मार्टफोनची लाँच डेट सांगितली आहे. कंपनीचा हा फोन चीनमध्ये 3 एप्रिल 2023 ला लाँच केला जाईल. ब्रँडनं आपल्या ऑफिशियल वीबो अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती शेयर केली आहे. तसेच प्रमोशनल पोस्टरमधून लाँच डेट व्यतिरिक्त फोनच्या डिजाइनचा देखील खुलासा करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर ऑफिशियल होण्यापूर्वी हँडसेट AnTuTu बेंचमार्किंग डेटाबेस वेबसाइटवर दिसला आहे त्यामुळे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

अशी असेल रियलमी जीटी नियो 5 एसईची डिजाइन

समोर आलेल्या प्रोमोशनल पोस्टरमध्ये बघू शकता की रियलमी जीटी नियो 5 एसई कसा दिसेल. डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि मागच्या बाजूला एक वर्टिकल एलइडी फ्लॅश असेल. कॅमेरा सेटअप एक मोठ्या आयताकृती मॉड्यूलमध्ये असेल. डिवाइसच्या मागच्या बाजूस कंपनीची ब्रँडिंग असेल. आशा आहे की जीटी नियो 5 एसईमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. हे देखील वाचा: Find My Device म्हणजे काय? कसं वापरायचं आणि याचे फायदे काय? जाणून घ्या महत्व

रियलमी जीटी नियो 5 एसईचे लीक स्पेसिफिकेशन्स

AnTuTu लिस्टिंग पाहता Realme GT Neo 5 SE मॉडेल नंबर Realme RMX3700 सह स्पॉट केला गेला आहे. यात फोननं एकूण 1009127 पॉईंट्स मिळवले आहेत. तसेच लिस्टिंगमधून समजलं आहे की डिवाइस Snapdragon 7+ Gen 2 processor सह येईल. तसेच यात 16GB RAM आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज असेल. हे देखील वाचा: 30 मार्चला भारतात येतोय Redmi Note 12 4G; मिळणार 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

त्याचबरोबर हा फोन अँड्रॉइड 13 बेस्ड रियलमी युआय 4.0 वर चालेल. जोडीला हँडसेट मध्ये 120Hz/144Hz रिफ्रेश रेट अ‍ॅमोलेड पॅनल आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here