विवो घेऊन येत आहे दोन नवीन 5जी फोन; Vivo T2 आणि T2x 5G होतील 11 एप्रिलला भारतात लाँच

Highlights

  • Vivo T2 Series 11 एप्रिलला भारतात लाँच होईल.
  • सीरीजमध्ये T2 5G आणि T2x 5G फोनचा समावेश करण्यात येईल.
  • विवो टी2 सीरीजची विक्री फ्लिपकार्टवरून केली जाईल.

विवो भारतीय बाजारात दोन नवीन 5जी फोन घेऊन येत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 11 एप्रिलला भारतात Vivo T2 Series लाँच होईल आणि टी2 5जी तथा टी2एक्स 5जी फोन बाजारात येतील. या सीरीजचं प्रोडक्ट पेज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे इंडिया लाँचपूर्वीच Vivo T2 आणि T2x 5G फोनचे महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर ठेवण्यात आले आहेत.

विवो टी2 सीरीज इंडिया लाँचची माहिती

कंपनीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की येत्या 11 एप्रिलला Vivo T2 5G आणि Vivo T2x 5G भारतात लाँच होतील. कंपनी व्हर्च्युअल इव्हेंटच्या माध्यमातून आपले नवीन फोन्स भारतीय बाजारात आणेल जो 11 एप्रिलला दुपारी 12 वाजता सुरु होईल. हा लाँच इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व विवो इंडिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीम होईल. फ्लिपकार्टवर Vivo T2 Series प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आहे तसेच दोन्ही 5जी फोन्सची विक्री याच शॉपिंग साइटवर होईल. हे देखील वाचा: iQOO Neo 6 च्या किंमतीत 5,000 रुपयांची मोठी कपात; जाणून घ्या नवी प्राइस

विवो टी2 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

लाँच डेटची माहिती देण्यासोबतच कंपनीनं सांगितलं आहे की या सीरीजमध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. फोन स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येईल जी फुलएचडी+ रिजोल्यूशनवर चालेल. तसेच विवो टी2 सीरीज स्मार्टफोनवर 1300निट्स ब्राइटनेस, 6000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट सारखे फीचर्स देखील दिले जातील.

फोटोग्राफीसाठी Vivo T2 Series मध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला जाईल. यात 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरचा समावेश असू शकतो. लीकमध्ये समोर आलेली माहिती पाहता या सीरीजच्या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट मिळू शकतो. तसेच फोन्समध्ये 8जीबी पर्यंतचा रॅम आणि 128जीबी पर्यंतची स्टोरेज दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: शाओमीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Xiaomi 13 Ultra ला मिळालं IMDA सर्टिफिकेट

बाजारातील Vivo T Series चे फोन्स

विवो टी2 5जी आणि टी2एक्स 5जी फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमतची माहिती 11 एप्रिलला समोर येईल. या सीरीज अंतगर्त कंपनीनं भारतात चार मोबाइल फोन लाँच केले आहेत ज्यात Vivo T1 Pro 5G, Vivo T1x, Vivo T1 5G आणि Vivo T1 4G चा समावेश आहे. यांची किंमत 11,999 रुपयांपासून सुरु होऊन 23,999 रुपयांपर्यंत जाते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here