एकच WhatsApp नंबर 2 फोनवर एकाचवेळी कसा वापरायचा? जाणून घ्या नवी आणि सेफ पद्धत

What Is Whatsapp Call Links Features Check Details

WhatsApp भारतातील नंबर एक इन्स्टंट मेसिजिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपची लोकप्रियता इतकी आहे की मेसेज कर ऐवजी लोक व्हॉट्सअ‍ॅप कर असं बोलतात. परंतु या लोकप्रिय अ‍ॅपमध्ये अजूनही असे अनेक फीचर्स उपलब्ध नाहीत, ज्यांची मागणी युजर्स गेली अनेक वर्ष करत आहेत. जेव्हापासून व्हॉट्सअ‍ॅप लाँच झालं आहे तेव्हापासून एका फीचरची मागणी सर्वाधिक आहे, ते म्हणजे एकच व्हॉट्सअ‍ॅप नंबरचं अकाऊंट दोन वेगवेगळ्या फोन्समध्ये वापरता येणं. अनेक वर्षांपासूनची युजर्सची ही मागणी आता व्हॉट्सअ‍ॅपनं मान्य केली आहे.

मेटा अंतर्गत आल्यापासून व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. डिलीट फॉर एव्हरीवन, लार्ज फाइल्स सेंड, व्यू वन्स मोड आणि कम्युनिटी फिचर हे नवीन फिचर मेटा अंतर्गत WhatsApp चा समावेश झाल्यानंतर आले आहेत. तर आता व्हॉट्सअ‍ॅपनं एकच WhatsApp अकाऊंट दोन वेगवेगळ्या फोन्समध्ये वापरण्याची सुविधा युजर्सना देण्याचा निर्णय घेतला आहे. हे देखील वाचा: कोणत्या बँडवर चालतंय तुमचं Jio, Airtel, BSNL सिम! काही क्लिक्समध्ये मिळवा माहिती

What Is Whatsapp Call Links Features Check Details

ज्याप्रकारे तुम्ही फोन आणि कंप्यूटरवर तुमचं अकाऊंट लॉगिन करू शकत होता त्याप्रकारे आता फोन्स देखील वापरता येतील. याआधी WhatsApp कंप्यूटर आणि फोन लिंक करू देत होतं परंतु टेलिग्राम प्रमाणे दोन फोन लिंक करणं अशक्य होतं. तुम्ही फोनवरील एका WhatsApp अकाऊंटला चार कम्प्युटर जोडू शकत होता. आता दोन फोन वर एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट वापरता येईल, चला जाणून घेऊया प्रोसेस.

एकच Whatsapp अकाऊंट दुसऱ्या फोनशी कसं लिंक करायचं?

सर्वप्रथम दोन स्मार्टफोन्सवर नवीन आणि लेटेस्ट व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन असेल याची खात्री करून घ्या. नसेल तर गूगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून नवीन व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन दोन्ही फोन्सवर इन्स्टॉल करून घ्या.

  • दुसऱ्या डिवाइसवर Whatsapp ओपन करा आणि “agree and continue” वर टॅप करा.
  • त्यानंतर वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या तीन डॉट्स वर क्लिक करा आणि मेन्यू ओपन करा.
  • त्यानंतर “link a device” वर टॅप करा. एक क्युआर कोड दिसेल.
  • तुमच्या प्राथमिक फोनवर जा जिथे सध्या तुमचं व्हॉट्सअ‍ॅप सुरु आहे. व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  • त्यानंतर “Linked devices” वर टॅप करा.
  • मग “Link a device” वर टॅप करा.
  • आता व्हॉट्सअ‍ॅप कॅमेरा ओपन होईल त्याने दुसऱ्या फोनवरील QR कोड स्कॅन करा.
  • मेसेज सिंक होण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या दुसऱ्या फोनवरील व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यास रेडी होईल.

हे देखील वाचा: Chienese Smartphones नको? मग हे आहेत बेस्ट नॉन चिनी मोबाइल; शक्तिशाली प्रोसेसरसह शानदार कॅमेरा

दुसऱ्या फोनवरील WhatsApp account बंद कसं करायचं?

दुसरा फोन हरवल्यास किंवा इतर कारणांमुळे जर तुम्हाला दुसऱ्या फोन किंवा कम्प्युटरवरील व्हॉट्सअ‍ॅप बंद करायचं असल्यास पुढील स्टेप्स फॉलो करा:

  • तुमच्या प्राथमिक फोनवर WhatsApp ओपन करा.
  • वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा.
  • त्यानंतर “Linked devices” वर टॅप करा.
  • तुमच्या दुसऱ्या फोनवर टॅप करा आणि “Log out” निवडा.
  • तुमच्या दुसऱ्या फोनवरील व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल. ही पद्धत वापरून तुम्ही दुसऱ्या फोनवरून प्राथमिक फोनवरील व्हॉट्सअ‍ॅप देखील बंद करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here