फीचर फोन यूजर्स साठी एयरटेलने आणली खास भेट, या प्लान मध्ये मिळेल सर्वकाही

Airtel ने यावेळी एक खास प्लान सादर केला आहे जो कि स्मार्टफोन यूजर्स साठी नसून फीचर फोन यूजर्स साठी आहे. कंपनी ने आपल्या प्रीपेड ग्राहकांना पुन्हा एकदा आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

एयरटेलने या नवीन रिचार्ज प्लानचे नाव ‘मेरा नया फीचर फोन’ रिचार्ज असे ठेवले आहे. कंपनीने हा प्लान खासकरून त्या यूजर्स साठी सादर केला आहे जे फीचर फोन वापरतात. 597 रुपयांच्या या प्लान मध्ये यूजर्सना दीर्घ वॅलिडिटी आणि जास्त डेटा सह अजून अनेक लाभ पण मिळतील. चला जाणून घेऊया या प्लानचे डीटेल्स.

हे देखील वाचा: Vivo नंतर Oppo ने पण केली F11 Pro च्या किंमतीत मोठी कपात, बघा नवीन प्राइस

एयरटेलचा हा प्लान फीचर फोन यूजर्स साठी आहे. जे यूजर आपला नवीन फीचर फोन या प्लानने रिचार्ज करतील त्यांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी कॉलिंग सह 168 दिवस 10जीबी डेटा मिळेल. सोबत वॅलिडिटी पीरियड पर्यंत रोज 28 दिवस यूजर्सच्या अकाउंट मध्ये 300 फ्री एसएमएस मिळतील. पण 4G हँडसेट वर या प्लानचा लाभ घेता येणार नाही.

तसेच जर तुमचा फोन 30 दिवसांपेक्षा जास्त जुना असेल तर प्लान मध्ये मिळणाऱ्या फायद्यांमध्ये काही बदल केले जातील. हे बदल यूजर्सच्या सर्कल वर अवलंबून असतील.

हे देखील वाचा: 5,999 रुपयांमध्ये 15 मे पासून विकला जाईल 13MP डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी असेलला Realme C2, रेडमीला मिळेल टक्कर

बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, यूपी-ईस्ट, यूपी-वेस्ट, गुजरात, महाराष्ट्र (मुंबई सोडून), हरियाणा, मध्य प्रदेश सर्कल मध्ये राहणाऱ्या यूजर्सचा फोन जर 30 दिवसांपेक्षा जास्त जुना असेल तर त्यांना 168 दिवसांच्या ऐवजी फक्त 140 दिवसांची वैधता मिळेल आणि सोबत 10जीबी डेटा मिळेल. हे सर्कल सोडून इतर सर्व सर्कल साठी या प्लान मध्ये 10जीबी डेटा मिळेल. तसेच या प्लानची वैधता 112 दिवस असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here