Vivo नंतर Oppo ने पण केली F11 Pro च्या किंमतीत मोठी कपात, बघा नवीन प्राइस

दिवाळीची वेळ यूजर्स साठी मोबाईल खरेदीसाठी बेस्ट वेळ असते. पंरतु ज्याप्रकारे सध्या भारतीय मोबाईल बाजारात प्राइस ड्रॉप झाले आहेत ते पाहून असे म्हणता येईल कि कदाचित यापेक्षा चांगल्या ऑफर नंतर मिळणार नाहीत. शाओमी पासून सॅमसंग आणि वीवो पासून गूगल ने पण काही दिवसांपूर्वी ऑफरच्या घोषणा केल्या होत्या. तसेच आता ओपो ने आपल्या नवीन फ्लॅगशिप फोन एफ11 च्या प्राइस मध्ये मोठी कपात केल्याची माहिती आली आहे. Oppo F11 Pro च्या दोन्ही मॉडेल मध्ये 2,000 रुपयांची कपात केली गेली आहे. हैराणीची बाब म्हणजे आजच बातमी आली होती कि कंपनी ने एफ11 प्रो चा एक 128जीबी मॉडेल लॉन्च केला आहे आणि सोबत 91मोबाईल्स कडे या फोन्सच्या प्राइस कटची एक्सक्लूसिव माहिती पण आली आहे.

भारतीय मोबाईल बाजारात Oppo F11 Pro प्रो 6जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी सह सादर केला गेला होता ज्याची किंमत 24,990 रुपये होती. पण 2,000 रुपयांच्या कपाती नंतर आता हा फोन 22,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तसेच कंपनी ने याचा एक दुसरा वेरियंट 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी मध्ये सादर केला होता ज्याची किंमत 25,990 रुपये होती पण आता हा फोन 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: 5,999 रुपयांमध्ये 15 मे पासून विकला जाईल 13MP डुअल कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी असेलला Realme C2, रेडमीला मिळेल टक्कर

कंपनीने आता पर्यंत अधिकृतपणे कोणती माहिती दिली नाही पण ओपो रिटेल सोर्स कडून आम्हाला हि बातमी मिळाली आहे. कंपनीने आपल्या रिटेलर्सना ऑफरची माहिती दिली आहे आणि हा मेसेज आम्हाला पण ऑफलाइन रिटेल सोर्स कडून मिळाला आहे. नवीन किंमत आज पासून लागू झाली आहे.

Oppo F11 Pro चे स्पेसिफिकेशन
Oppo F11 Pro चे स्पेसिफिकेशन पाहता यात 6.5-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 19.5:9 आसपोक्ट रेशियो वाल्या फूल व्यू डिस्प्ले सह उपलब्ध आहे. हा पूर्णपणे बेजल लेस आहे. Oppo F11 Pro मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो या फोनची मोठी यूएसपी आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे. ओपो एफ11 चा रियर कॅमेरा सेटअप लो लाईट फोटोग्राफीचे शानदार रिजल्ट देण्याचा दावा करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: सर्वात वेगळ्या कॅमेरा सेल्फी डिजाइन सह 28 मे ला भारतात लॉन्च होईल Oppo Reno, कंपनीने केला शिक्कामोर्तब

हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर झाला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. Oppo F11 Pro 4जी एलटीई आणि डुअल सिम सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्निक ने सुसज्ज 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here