बँक नव्हे तर Amazon Pay अकाऊंटमध्ये डिपॉजिट करा 2,000 रुपयांची नोट; घरबसल्या होईल काम

Highlights

  • Amazon Pay ची डोरस्टेप कॅश लोड सर्व्हिस आता 2,000 रुपयांच्या नोटा स्वीकारत आहे.
  • अतिरिक्त कॅश तुमच्या Amazon Pay बॅलन्समध्ये जोडली जाईल.
  • RBI च्या निर्देशानुसार 2,000 रुपयांच्या नोटा बँकेत डिपॉजिट करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 शेवटची तारीख आहे.

रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) नं 2,000 नोटा चलनात हटवण्याची घोषणा गेल्या महिन्यात केली आहे. त्यामुळे ह्या नोटा कायदेशीर चलन म्हणून वापरता येणार नाहीत, तसेच ह्या नोटा नजीकच्या बँकेत जाऊन 30 सप्टेंबर 2023 पूर्वी बदलून घेण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. ह्यासाठी बराच कालावधी असाल तरी बँकेत जाऊन नोटा बदलून घेण्याचा अनुभव त्रासदायक ठरू शकतो. ह्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon नं एक सोपा उपाय आणला आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही घरबसल्या 2000 रुपयांच्या नोटा डिपॉजिट करू शकता.

अ‍ॅमेझॉननं घोषणा केली आहे की ग्राहक आता त्यांच्या 2000 च्या नोटा अ‍ॅमेझॉन पेच्या कॅश लोड सर्व्हिसच्या मदतीनं घर बसल्या डिपॉजिट करू शकतात. ह्या सर्व्हिसमुळे ग्राहकांना अतिरिक्त नगद किंवा उर्वरित रक्कम डिलिव्हरी एजेंटला देता येईल. आणि अतिरिक्त रक्कम त्यांच्या Amazon Pay बॅलन्समध्ये जोडली जाईल, जिचा वापर डिजिटल पेमेंट करण्यासाठी केला जाईल.

परंतु ही सुविधा फक्त अ‍ॅमेझॉनच्या KYC पूर्ण असलेल्या ग्राहकांसाठी आहे. विशेष म्हणजे तुम्ही अ‍ॅमेझॉन KYC थेट शॉपिंग अ‍ॅपमधून पूर्ण करू शकता. ही व्हिडीओ केवायसीची प्रोसेस 5-10 मिनिटांत पूर्ण होते. अ‍ॅमेझॉननुसार ग्राहक प्रत्येक महिन्याला सुमारे 50,000 रुपयांपर्यंत रक्कम डिपॉजिट करू शकतात ज्यात 2,000 रुपयांच्या नोटांचा समावेश असू शकतो.

2,000 च्या नोटा Amazon Pay मध्ये डिपॉजिट कशा करायच्या?

  • नेहमीप्रमाणे अ‍ॅमेझॉनवर एखादी वस्तू ऑर्डर करा आणि कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शनची निवड करा.
  • डिलिव्हरीच्या वेळी डिलिव्हरी एजेंटला सांगा की तुम्हाला अ‍ॅमेझॉन पे बॅलन्समध्ये कॅश डिपॉजिट करायची आहे. त्यात तुमच्या ऑर्डर अमाऊंटच्या व्यतिरिक्त उरलेल्या रकमेच्या देखील समावेश असू शकतो.
  • डिलिव्हरी एजेंट तुमच्या अ‍ॅमेझॉन पे बॅलन्समध्ये पैसे अ‍ॅड करण्याची जबाबदारी घेईल. अ‍ॅमेझॉन अपडेटेड बॅलन्स ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये काही वेळातच दिसू लागेल. ते हा बॅलन्स बिल पेमेंट, फोन रिचार्ज आणि शॉपिंग सारख्या कामांसाठी डिजिटल पेमेंट्ससाठी वापरू शकतात. तसेच अ‍ॅमेझॉन युपीआय आयडीच्या माध्यमातून इतर लोकांना पैसे पाठवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here