Amazon Prime Lite मेंबरशिप प्लॅन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि बेनिफिट्स

Highlights

  • Prime Lite membership आता सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे.
  • Prime Lite membership मध्ये फक्त अ‍ॅन्युअल प्लॅन सादर करण्यात आला आहे.
  • Prime Lite membership मध्ये व्हिडीओ स्ट्रीमिंग व्यतिरिक्त अनेक लाभ मिळतील.

अ‍ॅमेझॉननं भारतात आपल्या प्राइम सर्व्हिसची एक नवीन आणि स्वस्त मेंबरशिप सुरु केली आहे. जिला अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट असं नाव देण्यात आलं आहे आणि ही सर्व्हिस पहिल्यांदा यावर्षीच्या सुरुवातीला निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध झाली होती. तसेच अ‍ॅमेझॉन प्राइम लाइटमध्ये प्राइम सारखे लाभ मिळतात. चला जाणून घेऊया ह्या नवीन मेंबरिशपची किंमत आणि बेनिफिट्स.

अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट सब्सक्रिप्शनची किंमत

अ‍ॅमेझॉन प्राइम लाइटची किंमत 999 रुपयांचे वार्षिक सदस्यत्व आहे. तसेच अ‍ॅमेझॉन प्राइम प्रमाणे लाइट व्हर्जनचे मंथली किंवा क्वार्टरली प्लॅन्स सादर करण्यात आले नाहीत. तुम्ही अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइट मोबाइल किंवा Android आणि iOS अ‍ॅपच्या माध्यमातून प्राइम लाइट मेंबरशिपसाठी साइन अप करू शकता.

अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट बेनिफिट्स

  • अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट सदस्यांना मोफत दोन दिवसांत डिलिव्हरी आणि स्टँडर्ड डिलिव्हरी मिळेल, ज्यासाठी किमान ऑडर्रचा नियम लागू नसेल. ह्यात मोफत नो-रश शिपिंग आणि 25 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. तसेच सकाळी डिलिव्हरी घेण्याचा ऑफ्शन आहे परंतु 175 रुपये प्रति वस्तू द्यावे लागतील.
  • अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट सदस्य ज्यांच्याकडे अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड आहे त्यांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरच्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.
  • ह्यात डिजिटल आणि गिफ्ट कार्ड खरेदीचा खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध नाही कारण त्यावर आधीच रिवर्ड्स आणि 2 टक्के कॅशबॅक दिला जातो.
  • अ‍ॅमेझॉन प्राइम प्रमाणे, लाइट सदस्यत्व देखील तुम्हाला प्राइम व्हिडीओचा अ‍ॅक्सेस देतं. तुम्ही प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असलेला कोणताही कंटेंट एचडी मध्ये आणि दोन डिवाइसवर जाहिरातींसह पाहू शकता.
  • अ‍ॅमेझॉन प्राइम लाइटच्या सदस्यांना लाइटनिंग डील्स, एक्सक्लूसिव्ह लाइटनिंग डील्स आणि डील्स ऑफ डेचा अर्ली अ‍ॅक्सेस मिळेल.

लाइट प्राइम आणि अ‍ॅमेझॉन प्राइममधील फरक

प्राइमच्या तुलनेत लाइट व्हर्जनमध्ये कमी बेनिफिट्स आहेत आणि त्यामुळे ह्याची किंमत कमी आहे. फरक पाहता, वन डे डिलिव्हरी, सेम डे डिलिव्हरी, प्राइम रीडिंग कॅटलॉगचा अ‍ॅक्सेस, प्राइम म्यूजिक आणि जाहिराती न पाहता प्राइम व्हिडीओचा समावेश आहे. लाइटमध्ये ‘प्राइम अ‍ॅडवांटेज’ देखील मिळत नाही त्यामुळे तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन आणि सहा महिन्याची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा मिळत नाही. तसेच अ‍ॅमेझॉन प्राइम मध्ये फ्री इन-गेम कंटेंट आणि अ‍ॅमेझॉन फॅमिली देखील मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here